शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

नांदेड रेतीघाटावरील तस्करांचा डाव हाणून पाडणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस्कराविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील नांदेड येथील वैनगंगा नदीवरील रेतीघाटाचा शासनाने गत काही महिन्यांपूर्वी लिलाव केला आहे. मात्र या लिलावपूर्ण रेतीघाटामुळे रेती तस्करांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा येण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील काही तस्करांनी शासनाने लिलाव केलेला रेतीघाट बंद पाडण्याचा बेत केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी खुद्द रेतीघाटधारकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तस्करांविरोधात तक्रार दाखल केल्याने जिल्हाधिकारी साहेब , तस्करांचा डाव हाणून पाडणार काय? असा सवाल तालुक्यातील जनतेत केला जात आहे.लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी काठावरुन गत काही महिन्यांपासून स्थानिक तालुका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात आहे. या नदीघाटांमध्ये दिघोरी, साखरा, चिकणा, तावशी, खोलमारा, तई, धर्मापुरी, कोच्छी, मांढळ, भागडी, आथली, आसोला, चप्राड, सोनी, आवळी, टेंभरी, विहीरगाव, गवराळा, दोनाड व ईटान आदींचा समावेश आहे. गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस्कराविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तथापि, विहीरगाव येथील अवैध रेतीसाठा प्रकरणी तस्करांची नावे उघड होऊनही दबावापोटी सबंधितांचे विरोधात कारवाई न करता प्रकरण दडपल्याचा आरोप देखील जनतेत केला जात आहे. एकंदरीत तालुक्यात गत काही महिण्यापासून सुरु असलेली रेतीची अवैध तस्करी नांदेड येथील लिलावीत रेतीघाटामुळे प्रशासनाच्या कारवाईत बंद पडण्याची भिती तस्करांत व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. सदर भितीपोटीच स्थानिक नांदेड येथील काही रेती तस्करांसह तालुक्यातील काही तस्करांनी संगणमताने लिलावीत रेतीघाट बंद पाडण्यासाठी धडपड चालविल्याची जोरदार चर्चा असुन जिल्हाधिकारी साहेब , तस्करांचा डाव हाणून पाडणार काय ? असा सवाल जनतेत केला जात आहे.

रेतीघाट मालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव - तालुक्यातील नांदेड येथील लिलावीत रेटीघाटाअंतर्गत गत १० जूनपासून उपसा बंद करण्यात आल्याने स्थानिक नांदेड गावातीलच काही रेती तस्करांनी रेतीघाट परीसरात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक चालविल्याची ओरड आहे. या गैरप्रकाराची माहिती रेतीघाट चालकास होताच लिलावीत रेतीघाट परीसरात नाल्या खोदुन नदीपात्रातील अवैध रेती वाहतुकदारांचा रस्ता बंद पाडला. तथापि, काही तस्करांनी खोदलेल्या नाल्या बुजवुन बेकायदेशीरपणे रेतीचा अवैध उपसा चालविल्याची तक्रार रेतीघाट मालकाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

 

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारी