शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दृष्टीहीन ‘गुरूदेव’ला देवदूत तारणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:29 IST

संतती हीच खरी संपत्ती आहे, या विश्वविख्यात ओळीला सार्थक समजणाºया माय-बापांची संख्या किती असावी, ही बाब दारोदारी फिरूनही मोजता येणार नाही.

ठळक मुद्देभावड येथील रहिवासी : मदतीच्या आशेने पालकांची दाहिदिशा

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संतती हीच खरी संपत्ती आहे, या विश्वविख्यात ओळीला सार्थक समजणाºया माय-बापांची संख्या किती असावी, ही बाब दारोदारी फिरूनही मोजता येणार नाही. पोटचा गोळा दिव्यांग जन्मला तर त्याची कधी-कधी हेळसांडही होते. मात्र ओळीला एक दाम्पत्य सार्थक ठरवित आहेत. जन्मत: दृष्टीहीन व अपंगत्व असलेल्या एका बालकाच्या पालनपोषणची मोठी जबाबदारी दीन दाम्पत्यावर येऊन ठेपली आहे. गुरूदेव संघपाल चिचमलकर (९) रा. भावड असे दिव्यांग बालकाचे नाव आहे.पवनी तालुक्यातील भावड येथील रहिवासी असलेल्या संघपाल चिचमलकर यांचे लग्न सुरेखा यांच्याशी झाले. संसाररूपी वेलीवर प्रथम मयुर नामक बाळाने जन्म घेतला. सिलिंगच्या हिस्स्यातून मिळालेली अर्धा एकर शेती व शेतमजुरीच्या जोरावर सासंरीक प्रपंच कसाबसा सुरू होता. अशातच सन ३० मे २००८ मध्ये गुरूदेवचा जम्न झाला. ओठ व नाकपुड्या यामध्ये अंतर नसल्याने चेहरा विद्रुप. अशातच डोळ्जांनाही शंभर टक्के अंधत्व.माणूस चेहºयाने नव्हे तर विचाराने व त्याच्या कर्माने जाणला जातो. माफ करावे पंरतू, नऊ वर्षाच्या गुरूदेवच्या चेहºयाकडे बघितल्यास थोडा वेळ पाहण्याची इच्छा होत नाही. विधाताच्या कृतीला आपण तिरस्कार तरी कसा करावा.जन्मल्यावर त्याला अलगद कडेवर उचलण्याचे धाडसही कुणी केले नाही. ज्या माऊलीने गुरूदेवला नऊ महिने पोटात वाढविले, जन्म दिला, तिने कधीही गुरूदेवचा तिरस्कार केला नाही. संतती कशीही असो आपण त्याचा सांभाळ करायचाच असा चंग त्यांनी बांधला.घरी अठरा विश्व दारिद््रय. अशा स्थितीत दोन्ही मुलांचे संगोपन अशक्य बाब. चिचमलकर दाम्पत्य खंबीर झाले. दिव्यांग स्थितीमुळे गुरूदेवची माणसिक स्थितीही काहीशी डगमगलेली. गुरूदेवला सांभाळायला एक जण आवश्यकच.चहा, बिस्कीट व मागितला तर भात, अशी गुरूदेवची दिवसभराची न्याहारी. पोटभर अन्न कधी त्याने खाल्लेच नाही. लहरी स्वभाव, ओरडणे, सतत हातवारे करणे हा त्याची दिनचर्याच झाली आहे.दानदाते समोर येणार काय?गुरुदेवचा उपचार शक्य नसल्याने त्याचा आयुष्यभर सांभाळ करण्यासाठी चिचमलकर दाम्पत्यांचा खटाटोप सुरु आहे. अशा स्थितीत त्यांना गावातील देवेंद्र हजारे यांनी कित्येकवेळा मदतीचा हात देवू केला आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही १० हजार रुपयांची मदत केली. परंतु घरातील दारिद्रता गुरुदेवच्या भविष्यकालीन जीवनावर बोट दाखवित आहे. समाजसेवी संस्था व अन्य दानदाते समोर येवून गुरुदेवच्या पालनपोषणासाठी मदत करणार काय? देवदूत त्याला तारणार काय असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या दानदात्यांना मदत करायची आहे, अशांनी गुरुदेवच्या नावे पवनी येथे असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियामधील खाते क्रमांक ३६८७४१७०८२३ येथे मदत जमा करता येईल.शासकीय मदत शून्यगुरूदेव जन्मत: अंध असल्याचे प्रमाणपत्र आरोग्य विभागाने देऊ केले आहे. मात्र प्रमाणपत्राचा उपयोग काय? असा प्रतिप्रश्नच त्याचे पालक विचारतात. चेहरा विद्रुप असल्याने मले घाबरतात, यामुळे शासकीय अंध विद्यालयाची दारेही त्याच्यासाठी बंद झालीत. भावड येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत नावापुरते गुरूदेवचे नाव घातले आहे. उठ, खाली बस, ताठ रहा हेच काही मोजकेच शब्द त्याला समजतात. शासकीय मदत मिळावी, यासाठी कुणीही मदतही केली नाही.