वन्यप्राण्यांची नोंद : लाखनीतील ग्रीन फ्रेन्डस्चा उपक्रमभंडारा : स्थानिक ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पामध्ये पाणवठ्यावरील प्राणी गणनेकरिता कोका अभयारण्यात सहभाग घेतला.कोका अभयारण्यातील प्राणी गणनेत ग्रीन फ्रेन्डस्च्या चमूचे प्रा. अशोक गायधने व प्रभाकर भोयर यांना कृत्रिम पाणवठा क्रमांक १६५ डोडमाझरी वर्तुळातील सालेहेटी क्षेत्र मिळाले. सोबत वनमजूर विकेश फुलसुंगे हे मचाणावर उपस्थित होते. सर्व अभ्यासक पंकज भिवगडे हे सोलापूरचे आेंकार सेलोकर यांच्यासोबत चिखलाबोडी तलावावरील मचाणावर होते. सचिन गिऱ्हेपुंजे संरक्षण बोरवेल क्रमांक १७३ वरील मचाणावर वनमजुर एच. बी. कोहळे सोबत होते. योगेश वंजारी हे सोलापुरचे मनोज सोलापुरे यांचेसोबत उसगाव वर्तुळाजवळील खोडतलाव मचाणावर बसले होते. श्रीकांत कोटांगले हे प्रदीप शिंदे व वनमजूर एम. एस. चांदेवार यांचेसोबत नैसर्गिक पळसझरा याठिकाणच्या मचाणावर उपस्थित होते. याचसोबत वैभव भुते, पराग भुते राजडोह व आमगाव तलावावरील मचाणावर उपस्थित होते.पुरकाबोडी वनक्षेत्रातील भागात नाना वाघाये व अजय खेडीकर यांनी प्राणी गणना केली. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट, अस्वल, रानगवे, नीलगाय, सांबर, चितळ, मोर, रानडुक्कर, रानकोंबडा, घुबड, गरुड, रानकुत्रे, वानर, रानमांजर व कोल्हे यांचे दर्शन दिवसा व पहाटे व रात्रीच्या घनदाट अंधारात घडले. प्रगणना अहवाल वनक्षेत्राधिकारी कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. गोखले व इतर कर्मचाऱ्यांना दिला. (तालुका प्रतिनिधी)
वन्यजीवप्रेमींची अभयारण्य भ्रमंती
By admin | Updated: May 18, 2015 00:31 IST