शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव विभागाने लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:15 IST

शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते.

ठळक मुद्देशेंडा परिसरातील शेतात कॅमेरे

वन्यजीव विभागाची दखल : नुकसानभरपाईचा घेणार आढावालोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोलयारी) : शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहेत. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तक्रार वनविभागाकडे वारंवार केली जाते. मात्र वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते.यावर तोडगा काढण्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून येथील शेतकरी लेमनदास पाटील लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारा भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्यामध्ये वन्यप्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत.येथील शेतकरी लिल्हारे यांची जवळच असलेल्या मोहघाटा येथे बारा एकर शेती आहे. त्यांच्या शेतात ऊस व धानाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्यांच्या शेतातील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच शेंडा, कोयलारी, कोहळीपार, प्रधानटोला, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवाणी येथील शेतकरी सुद्धा वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त आहेत.अशातच वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून शेतमालाचे नुकसान कोणकोणत्या वन्य प्राण्यांमुळे होते, हे शोधण्यासाठी लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारे भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत. या कॅमेºयाच्या एक फर्लांग अंतरावरील परिसरात कोणताही प्राणी अडकल्यास त्याचा फोटो आपोआप कॅमेºयात टिपला जातो. या परिसरात रानहल्ले, रानडुक्कर, अस्वल, निलघोडे, सांबर, चितळ तसेच हरणाच्या कळपांचा वावर राहतो. उन्हाळ्याला सुरुवात होताच पाण्याच्या शोधात गावाकडे, शेताकडे धाव घेतात. शेतात लावलेल्या धानपिकाची हिरवळ व ऊस खावून तृष्णा भागवतात. मात्र अशातच शेतमालाचे मोठे नुकसान करतात. काही शेतकºयांना तर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रासून रात्रभर शेतमालाची राखण करावी लागते.वन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जंगलाच्या चारही बाजूने काटेरी कुंपन केल्यास व पाण्यासाठी जंगलातच पाणवठे तयार केल्यास वन्य प्राणीही सुरक्षित राहतील व शेतमालाचे नुकसानही होणार नाही.