शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नैसर्गिक पाणवठ्यावरच वन्यप्राणी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगेत तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रचा समावेश असून, कृत्रिम पाणवठ्याअभावी वन्यप्राण्यांना नैसर्गिक पाणवठ्यावरच तहान भागवावी लागत आहे. तापत्या उन्हाने नैसर्गिक पाणवठेही तळाला जात असून, वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातून बावनथडीचा मुख्य कालवा असून, पाण्याच्या शोधात कालव्यात उतरून वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसत आहेत. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा विक्रम होत आहे.  वन्यप्राण्यांचा जीव पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर परिसरात आहे. सध्या मोजक्या तलावात पाणी उपलब्ध आहे. इतर लहान-मोठे तलाव आटलेले आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात चांदपूर तलाव, पांगडी तलाव व बावनथडी धरण व बावनथडी मुख्य कालवा, बघेडा तलाव आदी मोठे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यासाठी वन्यप्राण्यांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. बावनथडीच्या मुख्य कालव्यात पाणी पिण्यासाठी वन्यजीव उतरतात. मात्र, त्यांना पुन्हा वर चढणे कठीण होते. अनेकदा प्राणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. कधीकधी त्यांचा प्राणही जातो.वन विभागाने किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये विविध कामांवर खर्च करतो; परंतु वन्यप्राण्यांसाठी निधी खर्च होताना दिसत नाही. 

मध्यप्रदेशातील शिकारी नजर ठेवून

- महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

तुमसर वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाहीत. तशीही या वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्याची गरज नाही. -गोविंद लुचे, वन परिक्षेत्र अधिकारी, तुमसर

 

टॅग्स :water shortageपाणीकपातwildlifeवन्यजीव