शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

परवाना असूनही आमदार खासदारांकडे बंदूक का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:27 IST

Bhandara : सारेच म्हणतात, गरजच नाही; जनता हेच रक्षक!

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात तीन आमदार आणि एक खासदार आहेत. जनप्रतिनिधी म्हटल्यावर या सर्वांनाच स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना काढून बंदूक अथवा पिस्तूल वापरता येते. मात्र, जिल्ह्यात दोन आमदारांकडे शस्त्र परवाने आहेत. असे असले तरी ते शस्त्र वापरत नाहीत. तर एक आमदार व खासदारांकडे परवाना नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बंदूक नसल्याची माहिती आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे जनतेत फिरताना भीती कसली. जनता आणि कार्यकर्तेच आमचे रक्षणकर्ते आहेत, असे सर्वांचे मत आहे.

तुम्हालाही मिळू शकते शस्त्र भारतीय शस्त्र कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय नागरिकाला शस्त्र परवाना मिळविता येऊ शकतो. आत्मसंरक्षण (जंगली प्राण्यांपासून रक्षणासाठीही) आणि शेतीच्या संरक्षणासाठीही परवाना मिळतो. अर्जदाराची आवश्यकता, जीवितास धोका, व्यवसाय, चारित्र्य पार्श्वभूमी, नागरिकत्व आदींची पडताळणीनंतर परवाना मिळू शकतो.

खासदारांकडेही नाही बंदुकीचा परवाना भंडारा-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे नव्याने निवडून आले. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता, आपल्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याने बंदूकही नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

अर्ज कोठे, कसा कराल? हा शस्त्र परवाना मिळविण्यासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज भरून तो स्थानिक जिल्हा प्रशासन, म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत किंवा ज्या ठिकाणी पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आहेत, त्या ठिकाणी पोलिस आयुक्ताकडे हा अर्ज करावा लागतो.

नाना पटोले : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र, त्यांनी परवान्यासाठी कधीच अर्ज केला आहे. जनताच आपले रक्षक असल्याने शस्त्र बाळगण्याची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नरेंद्र भोंडेकर : नरेंद्र भोंडेकर हे दुसऱ्यांदा भंडारा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यांनी तो नुतनीकरणासाठी दिला आहे. राजू कारेमोरे : यांच्याकडे बंदूकीचा परवाना आहे. मात्र आमदार झाल्यापासून त्यांनी ते वरठी पोलिसस्टेशनला शस्त्र जमा केले आहे.

टॅग्स :MLAआमदारbhandara-acभंडारा