शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्यांपेक्षा लहान मुलांना अधिक राग का येतो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:51 IST

Bhandara : तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांवर रागावू नये, प्रेमाने सांगावे !

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अलीकडे जेवढा मोठा राग मोठ्या व्यक्तीला येतो, त्याच्या दुपटीने लहान मुलांना येत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांशी जवळीक साधून त्यांच्याशी प्रेमाने बोलत, कुरवाळत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन राग शांत करावा, प्रेमाने बोलले नाही तर मुलांच्या मनात राग कायम राहतो. त्यामुळे कधीही लहान मुलांना रागावू नये, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे. आधुनिक जीवन पद्धती लोप पावल्याने त्याचे वितरित परिणाम जाणवत आहेत.

मुलांमध्ये राग वाढण्याची कारणे काय? मोबाइलचा अतिवापर : लहान मूल रडू लागले की, अनेक पालक मुलाच्या हातात हल्ली मोबाइल देतात. यानंतर हा मोबाइल मागितला की मुले रागराग करतात. अशावेळी पालकांनी मोबाइल व इतर वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत. मुलांना मैदानात खेळण्यासाठी पुरेशी मोकळीक द्यावी. संयुक्त कुटुंबपद्धतीचा अभाव : नोकरीनिमित्ताने आज अनेक ठिकाणी एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली आहे. पती-पत्नी नोकरीला जात असून, लहान मुलांना पाळणाघरात ठेवत आहेत. अशावेळी लहान मुलांची चिडचिड होते व त्यांचा राग वाढणे स्वाभाविकच असते. त्यामुळे लहान मुलांशी प्रेमाने बोलत राहावे.

पालक काय म्हणतात"अलीकडे लहान मुलांना थोडे जरी बोलले तरी राग येतो. रागाच्या भरात दोन-दोन तास अबोला धरत आहेत. अशावेळी लहान मुलांची खूप समजूत काढावी लागते. प्रेमाने चांगले-वाईटाची समजूत द्यावी." - सुरेंद्र मदनकर, भंडारा

"लहान मुले नेहमीच मोबाइलचा हट्ट करीत असतात. मोबाइल दिला नाही की, चिडचिड करतात. मोबाइलसारख्या वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत, दिल्या तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. त्यांच्या मनातील भावना समजून घ्याव्या." - संजय बोंदरे, मुंडरी.

इतरांचा राग मुलांवर काढू नये..."कोणत्याही गोष्टीवरून रागराग करणे हे योग्य नव्हे. आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही की, अनेकजण रागराग करतात. राग आला की, घोटभर पाणी प्यावे व लहान मुलांना प्रेमाने समजावून सांगावे." - डॉ. सहास गजभिये, मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा

"पालकांनी इतर गोष्टीचा राग लहान मुलांवर काढणे योग्य नाही. लहान मुले ही कोवळ्या मनाची असतात. अशावेळी मुलांना प्रेमाने बोलून त्यांची समजूत काढल्यास मुलांचा रांग शांत होतो." - डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलbhandara-acभंडारा