आधुनिक युगातही ऐकू येते जात्याची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:34 AM2021-05-15T04:34:16+5:302021-05-15T04:34:16+5:30

दहा ते वीस वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे पारंपरिक साहित्य वापरले जात होते, परंतु गावागावांत इलेक्ट्रॉनिक मिक्सर, तसेच पीठगिरण्या, दालमिल यासारखी ...

The whining of the caste can be heard even in the modern age | आधुनिक युगातही ऐकू येते जात्याची घरघर

आधुनिक युगातही ऐकू येते जात्याची घरघर

Next

दहा ते वीस वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे पारंपरिक साहित्य वापरले जात होते, परंतु गावागावांत इलेक्ट्रॉनिक मिक्सर, तसेच पीठगिरण्या, दालमिल यासारखी यंत्रे पोहोचल्याने पारंपरिक जाते व उखळ कालबाह्य झाले. जुन्या पिढीतील महिला आजही जाते, पाटे व उखळाचा वापर करतात, परंतु नव्या पिढीतील महिला पारंपरिक साहित्याचा वापर करीत नाहीत. त्या कमी श्रम व कमी वेळेत अधिक काम करण्यावर भर देतात. काही महिला श्रम वाचविण्यासाठी गिरणीवर पीठ दळतात, तसेच दालमिलवर भरडाई करतात. शहरी भागात तर याला बगलच दिली जाते. महिला रेडिमेड वस्तू खरेदीवर अधिक भर देतात. असे असले, तरी आजही ग्रामीण भागात पारंपरिक साधनांवर दळण व भरडाईचे काम सुरू आहे. शहरातील नव्या पिढीला ही साधने माहीत नाहीत. त्यांना केवळ चित्र दाखवावे लागते, परंतु ग्रामीण भागात लहान मुलांना त्या साधनांविषयी आपसूकच माहिती मिळते. त्यांना याबाबत विशेष शिक्षण घेण्याची गरज नाही. स्वावलंबनाचे तत्त्व स्वीकारून महिला आजही जात्यावर दळण व भरडाईचे काम करीत आहेत. उन्हाळ्यात तर विविध पदार्थ तयार करण्याकरिता जाते, पाटे व उखळ आदी पारंपरिक साधनांचाच वापर केला जातो.

बॉक्य

लोकगीतांचा आवाज झाला दुर्मीळ

महिला पारंपरिक गीत, गवळणी, लोकगीते, हास्यगीते, त्याचप्रमाणे पाळणे गाऊन दळण व कांडणीचे काम करीत असत. मात्र, आजकाल ही लोकगीते महिलांच्या तोंडून गातानाचे आवाज ऐकू येत नाहीत. या गीत गायनामुळे महिलांना एक प्रकारची स्फूर्ती मिळायची, तसेच कामाला वेग यायचा. या काळात अजूनही अनेक पारंपरिक साहित्य जतन केले जाते. त्यामध्ये पाटा-वरवंटा, शेर, पायली, कुडव, मुसळाचा समावेश होता.

Web Title: The whining of the caste can be heard even in the modern age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.