शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

साहेब तुम्हीच सांगा, शेती रासायनिक करू की सेंद्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:12 IST

खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर : शेती व्यवसाय तोट्याचाच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : व्यवसायातून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करणे महागडे ठरत आहे. परिणामी शेती व्यवसायात तोटाच सहन करावा लागतो. रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत आणि सेंद्रिय खत वापरले तर त्याचा एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत शेतमालाच्या आधारभूत किमती मात्र फारच कमी आहे. त्यामुळे या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. रासायनिक खतांचा व तणनाशक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जमिनीचा स्तर घसरला आहे. तसेच यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही, पाण्याचा निचराही होत नसल्याने उत्पादनात घट येत आहे. शेती पुरेपूर रासायनिक खतांच्या वापराची झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खते त्वरित कार्य करणे शक्य नाही, यासाठी भरपूर अवधी लागेल, यासाठी काही प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल.

सेंद्रिय खतांचाही तुटवडा■ जिल्ह्यातील बरेच शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करून शेती व्यवसाय करण्यावर भर देत आहेत, पण सेंद्रिय खत स्वतः अंगमेहनत करून तयार करावे लागते, पण असे मात्र खूप कमी शेतकरी करतात, यामुळे सेंद्रिय खतांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीच कामाची ठरते.

सेंद्रिय शेतीतून भागणार कसे?■ आता शेती पूर्णतः रासायनिक खतांनी माखली आहे. या खतांच्या वापरामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे; पण आता सेंद्रिय खतांचा वापर केल्यास तुलनेत उत्पादनात कमालीची घट येईल, आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्पादन फार कमी होईल.

सेंद्रिय खते तरी स्वस्त कुठे?■ रासायनिक खते कृषी केंद्रातून सहज उपलब्ध होतात; पण सेंद्रिय खत मात्र तयार करावे लागतात, जर सेंद्रिय खत विकत घ्यायचे असल्यास यासाठी अधिक रक्कम मोजावी लागते, सध्या महिला बचत गटांकडून सेंद्रिय खत तयार केले जाते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराOrganic Farmingसेंद्रिय शेतीfarmingशेती