शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षापुर्वीचे जन्माचे दाखले कुठून आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंती करत आहे. गावाच्या बाहेर पालावर राहून आजही अनेक परिवार जगून राहिले आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे बाता शासन करते व कागदपत्रांच्या जाचक अटी समोर ठेवते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या-विमुक्त समाजाला मिळावे, असे निर्देश असले तरी कागदपत्रातील त्रुटी त्यांच्यासाठी मारक ठरत आहेत. भटके-विमुक्त ६० वर्षापूर्वीचे जन्माचे दाखले कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विशेष कॅम्प लावण्याची मागणी एकलव्य सेना, वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये १५ हजारांच्या वर अर्ज भरण्यात आले. पंचायत समिती व खंडविकास अधिकारी यांनी काही अर्ज न तपासताच समाजकल्याण विभागाकडे पाठविले. जेव्हा समाजकल्याण विभागमध्ये एवढे अर्ज आले त्या अर्जाची छाननी करताना विभागाची दमछाक झाली. छाननीमध्ये अनेक अर्जामध्ये कागदपत्रांची कमतरता होती. ज्यामध्ये जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंती करत आहे. गावाच्या बाहेर पालावर राहून आजही अनेक परिवार जगून राहिले आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे बाता शासन करते व कागदपत्रांच्या जाचक अटी समोर ठेवते. याने  शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते.  यासंदर्भात एकलव्य सेना, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने दाखवली. शिष्टमंडळात एकलव्य सेनेचे मार्गदर्शक व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सुरेश खंगार, अंकित तांदूळकर, विकेश तांदूळकर, राजू तांदुळकर, राजेश तिवस्कर, मिथुन सुतार, इंदिराबाई तिवस्कर   उपस्थित होते.ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ भटक्या विमुक्तांना मिळावे यासाठी गत दोन वर्षांपासून एकलव्य सेना व वंचितच्यावतीने लढा सुरू आहे. या लढ्याला यश मिळाले असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अडेलतट्टु धोरणाने अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित होत असल्याचे दिसते.

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रgovernment schemeसरकारी योजना