शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

दयाल भोवते। लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात ...

ठळक मुद्देआगळीवेगळी शक्कल : बॅनरच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा भारतीय युवा बेराजगार संघटनेचा प्रयत्न

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात फलक लावण्याची स्पर्धा दिसून येते. प्रत्येक गावातील चौक अशा फलकांनी ‘सजलेले’ दिसतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गावागावांतील चौकात लागलेले फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ असे शिर्षक असलेले आणि बेरोजगार तरुणांचे छायाचित्र असलेले फलक सध्या चर्चेचा विषय झाले आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याची ही शक्कल लढविण्यात आली आहे.शहरी असो की ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुणांना भेडसावीत आहे. उच्च शिक्षण घेवून आणि स्पर्धा परीक्षांचा तासन्तास अभ्यास करुनही नोकरी लागत नाही. शासन मेघाभरतीचे आश्वासन देवून तरुणांची दिशाभूल करीत आहे. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगारीची जीने जगत आहे. बेरोजगारीबाबत प्रत्येकजण शासनाच्या नावाने संताप व्यक्त करीत आहे. मात्र नोकऱ्याच मिळत नाही.आता या बेरोजगार तरुणांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव शक्कल लढविली आहे. गावागावातील चौकांमध्ये फलक लावून आम्हाला रोजगार केव्हा मिळणार असा सवाल विचारला आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून लावलेले हे फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गत काही वर्षात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. शासनाच्या या नाकर्तेपणावर बोट ठेवत फलक लावून तरुणांनी वेगळे आंदोलनच उभारल्याचे दिसत आहे.भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष बालु चुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले सर्वत्र बेरोजगारी दिसत आहे. बेरोजगारीमुळे तरुणांचे लग्नही जुळत नाही. उच्च शिक्षण घेतल्याने शेतीत काम करायलाही कुणी पुढे येत नाही. आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण होत नसल्याने तरुण निराशेत जात आहेत. अशा तरुणांच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी आपण पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा, दिघोरी, विरली बुज. यासह विविध गावात दर्शनी भागात लावलेले फलक तरुणांच्या व्यथा मांडत आहेत.शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेधलाखांदूर तालुक्यातील तरुणांनी गावागावांत फलक लावून रोजगाराबाबत शासनाचा उदासीन धोरणाचा एकप्रकारे निषेधच केला आहे. बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु गत पाच वर्षात तरुणांना नोकºया मिळाल्या नाही. उलट खाजगी आस्थापनातून मंदीच्या नावाखाली त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. मेगा भरतीतूनही बेरोजगारांच्या हाती काही लागले नाही. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारांची विदारक परिस्थिती आहे. अशा तरुणांनी आता फलकांच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार आम्हाला नोकरी कधी देणार असा सवाल करीत भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यातील तरुण एकत्र येत शासनाचा धोरणाचा निषेध करीत आहेत.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी