शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

विरलीतील पाणी समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:48 IST

मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्दे६६ लाखांची योजना कुचकामी : पाणी पुरवठा योजनेचे ग्रहण सुटता सुटेना

हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.सुमारे ३००० लोकवस्तीच्या या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपये खर्च करून वाढीव पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. यासाठी गावात पाच सार्वजनिक नळकोंडाळे आणि सुमारे ४५० खासगी नळजोडण्या कार्यरत आहेत. मात्र या पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंपधारकांना मिळत असलेले अभय आणि पाणी पुरवठा योजनेत वारंवार येत असलेल्या बिघाडांमुळे गावकºयांना गेल्या अडीच महिन्यांपासून दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणी पुरवठा केला जातो. परिणामी गावकºयांवर भर उन्हातान्हात गावाशेजारील शेतामधून बैलबंडी, ट्रॅक्टर, सायकल आदी साधनांनी पाणी आणण्याची पाळी आली आहे.गावात १५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. या हातपंपावरही रात्री बेरात्री पाणी भरणाºया महिलांची गर्दी आढळून येत असून पाण्यासाठी महिलांची आपआपसात भांडणे होत आहेत. या पाणी समस्येमुळे काही कुटुंबावर आपल्या बायको मुलांसह पाणी भरण्याची पाळी आली आहे. गावातील पाणी समस्येने एवढे गंभीर स्वरुप धारण केले असताना स्थानिक प्रशासनाला या पाणी पुरवठा योजनेतील बिघाड कायम स्वरुपी दूर करण्यात अपयश येत आहे.गावात सुमारे शंभरावर टिल्लूपंप धारक असून त्यात काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश आहे. या टिल्लूपंप धारकांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक प्रशासन या टिल्लू पंपधारकांना पाठीशी घालत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. नळधारकांना पाणी मिळत नसल्यामुळे ते आपल्या नळ कनेक्शनजवळ खड्डा खोदून विना परवानगीने मुख्य पाईपलाईनवर सोयीस्कर ठिकाणी नळजोडणी करून पाणी मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत. या नळधारकांवर ग्रामप्रशासनाचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे.सध्या या पाणी पुरवठा योजनेला अनेक समस्यांनी ग्रासले असून कधी मोटारची वायरिंग जळते, कधी व्हॉल्व निकामी होणे या सारख्या समस्या नित्याच्याच झालेल्या आहेत. सध्या गावात रोजगार हमीची कामे सुरु असून शेतकºयांची खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची शेतीकामे सुरु आहेत. अशा या कामांच्या धावपळीत वेळी अवेळी होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडत आहे.जलवर्षातच जलसंकटाची नामुष्कीविरली बु. ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभिमान, मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्रामप्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकऱ्यांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुष्की ओढवली.