जिल्ह्यात १२ हजार कर्मचारी : शासनाने आता तरी न्याय द्यावावरठी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे. राज्यातील ७,५०० कर्मचाऱ्यांनी गतवर्षी ४५ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार शासनस्तरावर बैठका घेण्यात आले होते. वर्ष लोटूनही अंशकालीन कर्मचारी भरतीचा प्रश्न कायम आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.१९९० च्या दशकात राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कार्यालयात पदवीधर असलेल्या युवक - युवतीना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राज्यातील ७,५०० पदवीधराना काम मिळाले होते. यात भंडारा जिल्ह्यातील एक हजार पदवीधर होते. सलग तीन वर्ष या कर्मचाऱ्यानी संबंधित कार्यालयात ३०० रूपये मानधनावर सेवा दिली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. यामुळे शेकडो अंशकालीन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अंशकालीन र्कमचारी म्हणून कामावर असल्यामुळे त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ७,५०० युवक बेरोजगार झाले.पदविधर अंशकालिन कर्मचाऱ्याच्या समस्यासंदर्भात १७ वर्षांपासून संघटनेकडून लढा सुरू आहे. गतवर्षी शासनाने त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते. उमेदीच्या काळात अचानक कामावरून कमी केले. कामावर घेण्यासाठी आंदोलनात १७ वर्षे उलटली. यामुळे शासकीय नोकरी वयोमर्यादा ओलांडण्यात आली. हाताला मिळेल ते काम आणि कुंटुबाचा गाडा ओढण्यात वय निघून गेल्यामुळे शासनाने अंशकालीन कर्मचाऱ्याना नियुक्त करण्याची मागणी संघटनेनी केली आहे. या संदर्भात शासनस्तरावर नियोजन आणि इतर योजना पुर्ण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन नोकरी देण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ बांगरे, रवींद्र लाजेंवार, योगेश मलेवार, शंकर हेमणे, विष्णु देशमुख, सरीता घोल्लर, सुरेखा डोंगरे, राजेश शहारे, दिलीप कळंबे, माधुरी बोंदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)
अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत केव्हा सामावून घेणार?
By admin | Updated: December 10, 2015 00:54 IST