शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१८ गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:46 IST

Bhandara : डिसेंबर २०२५ मध्ये निघणार निवडणुकीची अधिसूचना

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील १८ गट ग्रामपंचायतचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ मध्ये संपणार असून, निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक गट ग्रामपंचायतला मिळाली नाही. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. सोबतच ७९ ग्रामपंचायतचे आरक्षण घोषित करण्यात येत आहेत. ही संधी गट ग्रामपंचायतला प्राप्त होत नाही. गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी होत आहे.

तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायत आहेत. १८ गट ग्रामपंचायतच्या निवडणुका जानेवारी महिन्यात घेतल्या जात आहेत. जानेवारी २०२१ मध्ये गट ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. परंतु गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले नाही.

गट ग्रामपंचायतींना सरपंचपदाची थेट निवडणूक मिळाली नाही. ८९ ग्रामपंचायतला थेट सरपंचपदाची दोनदा संधी मिळाली आहे. परंतु गट ग्रामपंचायतला एकदाही संधी मिळाली नाही. गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढताना तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले जात आहेत. सरपंचपदाचे आरक्षण घोषित केल्यानंतर ८९ गावांतील नागरिकांना सरपंचपद आरक्षित माहिती होत आहे. २ वर्षांचे आधीच माहिती होत असल्याने गावातील इच्छुक या दिशेने तयारी करीत आहेत.

दोन वर्षांचे आधीच आरक्षण घोषित करण्याची संधी गट ग्रामपंचायतला प्राप्त झाली पाहिजे. परंतु या दिशेने निर्णय घेतले जात नसल्याने गट ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या गावात नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका गट ग्रामपंचायतला बसला आहे.सदस्यांनी सरपंच पदावर निवड केली आहे. गावात थेट निवड प्रक्रियेची संधी गट ग्रामपंचायतला मिळणार असल्याने सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी गावातून होत आहे.

गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले पाहिजे. सरपंचपद थेट निवडणुकीची संधी तालुक्यातील गट ग्रामपंचायतला मिळाली नाही. ही संधी ८९ ग्रामपंचायतला मिळाली आहे. गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांना आधीच सरपंचपदाचे आरक्षणाची माहिती होईल.- देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष, सरपंच संघटना, तुमसर. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचbhandara-acभंडारा