शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शेतजमिनीचा मोबदला मिळणार काय?

By admin | Updated: December 13, 2015 00:27 IST

बावनथडी सिंचन प्रकल्प बांधकाम होण्यासाठी ४० वर्षांपासून कार्य सुरु आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ....

राजेंद्र पटले यांचा सवाल : आंदोलनाचा इशाराभंडारा : बावनथडी सिंचन प्रकल्प बांधकाम होण्यासाठी ४० वर्षांपासून कार्य सुरु आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अजूनही पूर्णपणे मिळालेला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.अनेक वेळा निवेदने व कार्यालयाच्या चकरा मारुनही शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आली. यावर शासनाने न्यायालयात दिले गेलेले कारण योग्य नसून या संदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते तथा किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी दिला आहे. शासन ४० वर्षांपासून बावनथडी सिंचन प्रकल्प सुरु करु शकला नाही. अजूनही ३० टक्के कालव्याचे काम शिल्लक आहे. बावनथडी कालव्याच्या वितरिका पूर्ण न झाल्याने मुख्य कालव्याला फोडून पाणी नेण्याच्या घडत असतात. यासाठी कालव्याचे उर्वरित काम पूर्ण करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीमध्ये आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांना ५ कोटी ८७ लक्ष ९४ हजार रुपयांची मदत दिली असल्याचे म्हटले आहे. तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे मोबदला मिळाला नाही. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी याबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची गरज असताना मोहाडी व तुमसर तालुका प्रशासनाने याबाबत कारवाई केली नाही. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे पटले यांनी कळविले आहे. कालव्यात गेलेल्या शेतजमिनीचा तत्काळ मोबदला द्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील अशा इशाराही राजेंद्र पटले यांनी निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)