करडी (पालोरा) : करडी परिसरात विद्युत विभागाच्या भारनियमनाचा फटका सर्वत्र बसत आहे. परिसरात ११ तासाचे भारनियमन होत असल्याने शेतातील पिक वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वैनगंगा शुगर कारखाना व व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. एकंदर नुकसानीचे सत्र सुरु आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थती घोषित झालेली असतांना शासन वेठीस धरत आहे. त्वरित भारनियमन बंद करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.करडी परिसर मागासलेले क्षेत्र म्हणून ओळखले जाते. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून परिसरात गुळ घाणी, पिठ गिरण्या, धानपिसाई मिल, वेल्डींग व्यवसाय आदी अन्य व्यवसाय केले जात आहेत. परिसरात वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर तसेच ऐलोरा पेपर मिल सारखे मध्यम स्वरुपाचे उद्योगही आहेत. सर्वत्र सुरळीत असतांना अचानक शासन व विद्युत विभागाने परिसराला भारनियमनाचा शॉक दिला आहे. एक दोन तासाचे नव्हे तर तब्बल ११ तासाचे भारनियमन केले जात असल्याने परिसराची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतातील रब्बी पिके, ऊस व भाजीपाला पिके करपू लागली असून व्यावसायीकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. रात्रीच्या वेळी रात्रीचे प्रमाण वाढले आहेत. वैनगंगा कारखान्याचे पेट्रोल, डिझेल पंप व बोरगाव येथील पंपसुध्दा बंद राहू लागल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. नागरिक विज बिलाचा भरणा वेळेवर करित असतांना क्षेत्राला ‘इ’ ग्रुप भारनियमनाच्या श्रेणीत टाकण्यात आले असून शासन क्षेत्राचे आमदार, खासदार मुकदर्शक बनले आहेत.
करडी परिसरात भारनियमनाचा फटका
By admin | Updated: February 9, 2015 23:08 IST