जीव मुठीत घेऊन करावा लागते भाजी खरेदी : जुन्या भाजीबाजाराबाबत नगरपालिकेने निर्णय करावातुमसर : ऐतिहासिक तुमसर शहराचा आठवडी बाजार भर रस्त्यावर भरत आहे. शहराचा आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो. बाजार कुठे भरावा याचे नियोजन दुर्देवाने अद्यापपर्यंत करण्यात आले नाही. येथे महिला व पुरूष भाजी खरेदीदारांना जीव मुठीत घेवूनच येथे भाजी खरेदी करावे लागते.शहराचा आठवडी बाजार तुमसर-देव्हाडी मार्ग, बोसनगरातील अंतर्गत रस्त्यावर जैन मंदीर चौक, मोर हिंदी शाळा, स्टेट बँक गल्ली, रायबहादूर शाळेसमोर, वनविभाग कार्यालयासमोर भाजी बाजार भरत आहे. तुमसर-देव्हाडी मार्ग हा रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे येथून वाहनांची ये-जा सुरूच असते. भाजी विक्रेते व खरेदीदारांना जीव मुठीत घेवून बाजार करावा लागतो. शहरात बाजार भरण्याकरिता मुळीच जागा नाही. पर्यायी व्यवस्था केवळ रेल्वे प्रशासनाच्या जागेवर होऊ शकते. तथा नेहरू क्रिडांगणावर बाजार भरू शकतो, परंतु हा पर्याय ग्राहकाां दूर होतो. रेल्वे प्रशासन येथे मंजूरी देण्याची शक्यता कमी आहे. नगरपरिषदेची भाजी बाजाराची स्वतंत्र चाळ आहे. ही चाळ खूप जूनी आहे. येथे जून्या भाजी विके्रत्यांनी आपल्या वारसदारांकडे ही दुकाने हस्तांतरीत केल्याची माहिती आहे. काही दुकाने येथे आजही सुरू आहेत, परंतु ग्राहक या जून्या भाजी बाजाराकडे भटकत नाही. नियमानुसार कारवाई करण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)मासेबाजार उघड्यावरशहरात जुन्या श्रीराम टॉकीज मागे मोठा बाजार भरतो. हा बाजार उघड्यावर भरत आहे. पावसाळ्यात ओलेचिंब होवून मासेमारांना मासेविक्री करावी लागतात. कायमस्वरूपी येथे दुकानाचे गाळे तयार करण्याची गरज आहे. मासेविक्री करावी लागतात. कायमस्वरूपी येथे दुकानाचे जाळे तयार करण्याची गरज आहे. मटन व कोंबडी बाजाराकरिता येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तिन्ही बाजारात प्रवेश करतानी ग्राहकांना नाक दाबूनच प्रवेश करावा लागतो. कोंबडी बाजारासमोरील मोठी नाली सांडपाण्याने तुडूंब भरली आहे. नालीतील निरूपयोगी पदार्थ सडल्याने येथे उग्रवास येतो. येथे दररोज स्वच्छतेची व्यवस्था नगरपरिषदेने करण्याची गरज आहे.
आठवडी बाजार रस्त्यावर
By admin | Updated: July 24, 2015 00:36 IST