आठवडाभरापासून वीज खांबासह तारा पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:32 PM2018-04-20T22:32:46+5:302018-04-20T22:33:02+5:30

From the week, there is a star with a pillar and a star | आठवडाभरापासून वीज खांबासह तारा पडूनच

आठवडाभरापासून वीज खांबासह तारा पडूनच

Next
ठळक मुद्देधानपिकाला धोका : वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वीज वितरण कंपनी हायटेक झाल्याचा दावा करीत जरी असले तरी वीज ग्राहकांच्या दिवसेंदिवस तक्रारीत वाढ होत आहे. आठवड्याभरापुर्वी आलेल्या वादळात सुकळी, ढोरवाडा शिवारात वीज तारा व खांब भुईसपाट झाले, परंतु आठवड्याभरानंतरही शेतकऱ्यांच्या शेतात साहित्य पडून आहेत. दुरुस्तीकरिता पुन्हा चार ते पाच दिवस लागतील, असे अभियंते सांगत आहेत. उन्हाळी धानपिक, तथा जनावरांंना पाणी कुठून पाजावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
१५ एप्रिल रोजी तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह वीज खांब व वीज तारा भुईसपाट झाल्या. अनेक रोहित्र निकामी झाले. माडगी (देव्हाडी) येथे एका मोठ्या रोहित्राला आग लागली होती. ग्रामीण भागात दोन दिवसानंतर वीज पुर्ववत सुरु झाली. परंतु शेतशिवारातील वीज खांब व वीज तारा शेतात आजही पडून आहेत. सुकळी (दे), ढोरवाडा शेतकरी रविंद्र सार्वे, रामकृष्ण जगनाडे, नाना बुराडे, सरपंच ज्ञानेश्वर भोयर, लंकेश जगनाडे, रामभाऊ बोंदरे, दुर्गादास उरकुडे यांनी तक्रार केली आहे. सुकळी शिवारताील आठ रोहित्र बंद पडून आहेत. सुकळी येथे पाणीपुरवठा योजना सुरु राहली म्हणून दुसरीकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. महादेव ठवकर यांच्या शेतात वीज तारा तुटून पडल्या. दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरु केल्याने म्हशीला वीजेचा धक्का बसला यात म्हैस जागीच ठार झाली.
धानपीक धोक्यात
सध्या शेतात धानपीक आहे. तीव्र उन्हाळा सुरु आहे. धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे, परंतु मागील आठ दिवसापासून वीजपुरवठा बंद असल्याने सुकळी, ढोरवाडा, मांढळ, रोहा शिवारताील धान पिकाने माना खाली घातल्या आहेत. शेतकरी येथे चितांतूर असुन त्यांच्याच तीव्र असंतोष व्याप्त आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
शेतशिवारात वीज खांबा व तारा पडून असल्याने वीजपुरवठा खंडीत आहे. त्याचा फटका धान पीकाला बसत आहे. परंतु वीज वितरण कंपनीला बाब विचारण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न न केल्याची तक्रार सुकळी (देव्हाडी) येथील शेतकऱ्यांनी केली.

मागील आठ दिवसापासून शेतात वीज खांब व तारा पडून असून कामांना अजून सुरुवात झाली नाही. प्रथम वीज बील भरा नंतर कामे सुरु करु असे आम्हास सांगण्यात आले. येथे वीज वितरण कंपनीची हुकूमशाही सुरु आहे.
- रविंद्र सार्वे
शेतकरी सुकळी (दे)
येत्या चार ते पाच दिवसात कामे पूर्ण केली जातील. वीज तारा व खांब भुईसपाट झाले आहे. या तांत्रिक कामाला थोडा वेळ लागतो.
- रुपेश अवचट,
उपविभागीय अभियंता
वीज वितरण कपंनी तुमसर

Web Title: From the week, there is a star with a pillar and a star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.