शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

खराशी गावाची स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर शाळेचा नावलौकीक : सामाजिक सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी गावाचा एकोपा

लोकमत न्यूज नेटवर्कखराशी : लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या काठावर वसलेली खराशी गाव जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून राज्यस्तरावर ओळख निर्माण झाली आहे. मात्र फक्त शिक्षणातच आघाडीवर नसून गावात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत एका चमूने खराशी येथे भेट दिली आहे. या चमूने गावात राबविलेल्या शैक्षणिक, सांस्कृतीक उपक्रमांसह हागणदारीमुक्त गाव, कर वसुली व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली.खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे.गावात पिण्याच्या पाण्याचा नळयोजनेत ग्रामपंचायत यशस्वी ठरले आहेत. गावात असणाºया कच्चा रस्त्यांवर मात करीत सिमेंट, डांबरीकरण रस्ते तसेच गावात सभागृहासह इतर सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. गावाच्या विकासासाठी शिक्षकांसह संत आणि युवकांचा वाढता सहभाग अशी नवी ओळख होत आहे. युवकांच्या एकीमुळे गावात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. गावात आरोग्य व्यवस्थेवर विशेष भर असून गावातील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील भागातून नागरिक उपचारासाठी येतो. येथील जिल्हा परिषद शाळा व रावजी फटे विद्यालय, विविकानंद विद्यालय हे शैक्षणिक क्षेत्र उल्लखनीय काम करत आहेत. गावात ग्रामसेवक, तलाठी, दवाखाना या शासकीय कर्मचाºयांमार्फत गावकºयांच्या अडचणी सोडविण्यात यश आले आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच मिटविले जातात. यासाठी शासनाने विशेष पुरस्कार दिला आहे.गावात विविध उपक्रमांसह जिल्ह्यात स्मार्टग्राम म्हणून खराशीचा नावलौकीक होईल, यासाठी सर्वांचा सहभाग असल्याचे उपसरपंच सुधन्वा चेटूले यांनी सांगितले. गावात शिवतिर्थ, मानव कल्याणकारी संस्था आणि बचत गट, भजनी मंडळ, क्रीडा मंडळ, वाचनालय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावाचा एकोपा टिकून आहे. खराशीच्या शाळेमुळे गावाचा नावलौकीक झालाच आहे. मात्र इतर उपक्रमांमुळे खराशी गावाची स्मार्ट ग्रामकडे वाटचाल सुरू आहे.गावकºयांच्या सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी शक्य होत आहे. महिलांच्या पुढाकाराने गावाचे नाव नक्कीच मोठे होईल.-अंकिता झलके, सरपंच खराशी.विविध विकास कामे गावात खेचून गावाला जिल्ह्यात नावलौकीक प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत आहोत. यासाठी सर्वांचा सहभाग मिळतो आहे.-सुधन्वा चेटूले, उपसरपंच खराशी.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान