शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२० कोटींची पाणीपुरवठा योजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:24 IST

नगर पंचायत मोहाडीतर्फे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने वीस कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धूळखात पडला आहे,.....

ठळक मुद्देमोहाडीतील प्रकार : नगर पंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय मान्यतेसाठी आटापिटा

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नगर पंचायत मोहाडीतर्फे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने वीस कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धूळखात पडला आहे, यासाठी नगराध्यक्षांसह काही नगरसेवक मंत्रालयात सुद्धा जाऊन आले पण त्यांना अजूनपर्यंत तरी यश प्राप्त झालेले नाही, यात जर या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर मोहाडीकरांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणार नाही.मोहाडी शहराला कालबाह्य झालेल्या ४७ वर्षे जुन्या नळ योजने द्वारेच पाणीपुरवठा सुरू असल्याने गरजेपुरता सुद्धा पाणी मिळणे कठीण झाले आहे, दोन दिवसाआड नळाला पाणी येतो मात्र तोही पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही, शहरातील बहुतांश विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत, त्यामुळे येथील जनतेला शहराबाहेरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या धनदानंडग्या लोकांनी आपल्या घरी बोरवेल खोदल्यामुळे त्यांना पाण्याची टंचाई भासत नाही मात्र ६० टक्के सामान्य लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.मोहाडीची पाणीपुरवठा योजना मोहगाव जवळील सूर नदीवर कार्यान्वित आहे. सूर नदी कोरडी पडली असल्याने तेथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीला आवश्यक तेवढा पाणी उपलब्ध नाही. दोन बोअरवेलच्या माध्यमातून दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले आहे. पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता बघता चार ते पाच दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तुमसर आणि भंडारा येथील नळ योजनेला शासनाने हिरवी झेंडी दाखविली. मात्र मोहाडी येथील योजना तशीच पडून आहे यावर जनतेनेच काय तो निर्णय घेणे अपेक्षित आहेलावेसर येथे नवीन पाणीपुरवठा योजनावीस कोटीची नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावानुसार नळ योजनेची मुख्य विहीर वैनगंगा नदी पात्रातील लावेसर येथे सनफ़्लैग कंपनीच्या नळ योजनेच्या बाजूला खोदण्यात येणार आहे, गोसीखुर्द धरणाचा बॅक वॉटर सतत लावेसर पर्यंत राहत असल्याने पाणी टंचाई भासणार नाही हा त्यामागील उद्देश आहे, या योजनेची जलवाहिनी लावेसर, कोथूरना, रोहना, दहेगाव मार्गे मोहाडीला आणण्यात येणार आहे, सदर योजनेत एक मुख्य टाकी (एम.डी.आर.) व तीन नवीन टाक़्या, तसेच जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे, शहरात नवीन जलवितरण वाहिन्या सुद्धा टाकण्यात येतील व नळाला मीटर सुद्धा बसविण्याचे प्रयोजन सदर प्रस्तावात आहे, लावेसर येथून शक्तिशाली मोटार पंपाद्वारे मोहाडी येथील मुख्य टाकीत पाणी सोडले जाईल व मुख्य टाकीतून इतर तीन टाक्यात पाण्याच्या दाबाने त्या टाक्या भरल्या जातील अशी नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे,.स्वखर्चाने बनविली बोअरवेलशासनाकडून चालू नळ योजनेसाठी मदत मिळत नसल्याने व शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन खोडगाव पाणीपुरवठा योजनेवर नगरपंचायत उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, नगरसेवक प्रदीप वाडीभस्मे, व गणेश निमजे यांनी मिळून स्वखर्चाने बोअरवेल खोदून त्यावर पंप बसविला ज्यामुळे सध्या दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले आहे, तसेच नागरी सुविधा योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मोहगाव पाणीपुरवठा योजनेवर एक बोअरवेल खोदण्यात आली मात्र एक वर्ष लोटूनही त्यावर पंप बसविण्यात आलेला नाही, यासाठी सा. बा. विभागाशी अनेक पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आले, पण पंप बसविन्यात आले नाही. अखेर उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे यांनी स्वत:च्या शेतातील सबमर्सिबल पंप आणून त्या बोअरवेल मधे तात्पुरत्या स्वरूपात लावून जनतेसाठी पाणी उपलब्ध करून दिले. या प्रयत्नामुळेच सुरनदी कोरडी पडल्यावर व विहिरीत पाणी नसताना सुद्धा दोन दिवसाआड पाणी देणे शक्य झाले.नवीन पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झालेली असून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरनदी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे, सुरनदीवर जवळपास २० ते २५ पाणीपुरवठा योजना असल्याने पेंच चे पाणी सोडल्यास सर्वांना त्याचा लाभ होईल, तसेच नळ येण्याच्या वेळेवर वीज बंद करण्याची गरज आहे.-सुनील गिरीपुंजे, न.प.उपाध्यक्ष

टॅग्स :Waterपाणी