शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात २६ गावांचे जलस्रोत दूषित; दूषित पाण्याने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:09 IST

Bhandara : ४४ पेक्षा अधिक जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने ७६६ गावांपैकी ७५२ गावांतील जलस्रोतांची तपासणी केली असून, २६ गावांतील जलस्रोत दूषित, रासायनिकदृष्ट्वा अपायकारक किंवा जिवाणूयुक्त असल्याचे निष्पन्न झाले, जिल्ह्यातील ४४ पेक्षा तसेच जास्त जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले. या दूषित पाण्यामुळे डेंग्यू कॉलरा, हिपॅटायटिस, टायफॉइड यांसारखे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरवर्षी दोन वेळा एप्रिल ते जुलै आणि ऑक्टोबर ते मार्चमध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली आणि लाखांदूर येथील जिल्हा परिषद प्रयोगशाळांमध्ये जलस्रोतांची रासायनिक व जाते. यंदा एकूण ७४० गावांतील पाण्याची रासायनिक व ७५० गावांतील जिवाणू तपासणी करण्यात आली. यापैकी २६ गावांत पाणी आरोग्यासाठी धोका ठरले, तर ४४ जलस्रोत पूर्णपणे पेयजलासाठी अयोग्य ठरले.

जिल्ह्यातील वैनगंगा नदीचे पाणीही प्रदूषित असून यामुळे शहर व गावांमध्ये पाणीटंचाईचे समस्या वाढल्या आहेत. गोसेखुर्द प्रकल्पामधील जलवाहिन्यांचा व राज्य यंत्रणांचा अभाव यामुळे नदीप्रवाहाचा नुकसानीचा फटका स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत जलस्रोतांची शुद्धता आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी जलसंधारण व स्वच्छता योजनेवर अधिक भर देणे अत्यावश्यक आहे.

जिल्हा प्रशासनाने दूषित जलस्रोतांतर त्वरित योग्य उपचार करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदृष्ट्या स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळावे, या दिशेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या तपासणीतील निष्कर्ष नागरिकांसाठी आव्हान असून, प्रदूषित पाणी पिण्यापासून वंचित राहणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

उपाययोजनांची गरजदूरदृष्टीने जिल्ह्यातील गावांमध्ये शाश्वत जलसंधारण प्रकल्प राबविणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे खोदणे आणि जलशुद्धीकरण यंत्रणा सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून जलदूषिततेचा परिणाम कमी करता येईल आणि गावातील पाण्याचा दर्जा सुधारता येईल, अशा उपाययोजनांनीच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता सुधारून लोकसंविधानसंबंधी आरोग्याच्या संकटांपासून मुक्तता मिळणे शक्य होणार आहे.

"भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वर्षातून दोनवेळा जलस्रोतांची तपासणी केली जाते. ब्लीचिंग पावडर, फिटकरीचा वापर करून शुद्धीकरण केले जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जलतपासणी करून पाणी वापरण्यास योग्य आहे का, हे निश्चित केले जाते. पावसाळ्यानंतर जलस्रोतांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुन्हा तपासणी मोहीम राबवण्यात येईल. त्यासाठी यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या जातील."- माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbhandara-acभंडारा