शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या उपाययोजना झाल्या प्रभावहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:28 IST

तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत.

ठळक मुद्देगावागावांत पाणीटंचाई : कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण, कृती आराखड्यातील उपाययोजनांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच माय माऊल्यांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे.भंडारा जिल्ह्यात तेराशेच्या वर तलाव आणि विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या आहेत. असे असतानाही यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला. ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. १५५५ उपाययोजनांसाठी १२ कोटी ५८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विहिर खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ विंधन विहिरी खोदण्यावरच खर्च करण्यात आला. इतर योजनांकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गावागावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील जलस्त्रोत तळाला गेले आहेत. नदीचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. हातपंपाला तासन्तास हापसल्यानंतर कळशीभर पाणी मिळते. त्यामुळे अनेकांना रोज मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रकल्पाचे पाणी सोडण्याची प्रतीक्षाजिल्ह्यात मोठे आणि मध्यम प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात या प्रकल्पाचे पाणी सोडले जाणार असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु अद्यापर्यंत प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले नाही. पेंच, बावनथडी, इडियाडोह या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार होते. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. या प्रकल्पाचे पाणी सोडल्यास नदी तीरावरील गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्यातून पाणीटंचाई संपुष्टात येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई