विहिरींची पातळीही खालावली : आठ महिन्यांपासुन पाणीपुरवठा योजना बंद विशाल रणदिवे/प्रकाश हातेल अड्याळ/चिचाळअडयाळ/चिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या पोटज्ञतील सौंदळ, खापरी पुनर्वसनातील पाणी पुरवठा योजनेची वीज कपात केल्याने या वर्षाला पाणी समस्या उग्ररुप धारण करणार आहे. पुनर्वसन विभागाने उर्वरित कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरीत केल्याने जि.प. मार्फत पुनर्वसनात विविध कामाचा प्रांरभ झाला आहे. मात्र विद्युत बिल अद्यापही भरण्यात न आल्याने पाणी समस्या उग्ररुप धारण करणार आहे.गावाचे पुनर्वसन करतांना भौतिक सुविधा देण्याची आश्वासने देण्यात आली होते. पंरतु अद्यापही नागरी सुविधाची पुर्तता शासनाने केली नाही. ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार घातले. पुनर्वसनाची कामे शासनाने जिल्हा परिषदेला हस्तांतरीत केल्याने जि.प. ने विविध कामे युध्दस्तरावर सुरु केली. मात्र पुनर्वसन विभागाने जि.प. ला कामे हस्तांतरीत केल्याने पुनर्वसनातील विविध समस्या जि.प. ने मार्गी लावण्याचे निकष आहे. पुनर्वसनातील पाणी पुरवठ्याची विद्युत मागील आठ महिन्यांपासुन कपात केल्याने प्रकल्पग्रस्तांना पाण्याची भटकी करावी लागत आहे. या वर्षाला उन्हाळा प्रारंभापासूनच सुर्य तिव्र आग ओकत आहे. उन्हाची दाहकता तिव्र भासत असल्याने पुनर्वसनातील बोरवेल विहिरीची पातळी खोल जावून विहिरीत एक ते दीड फुट पाणी आहे. विहिरी, बोअरवेलवर महिलांची गर्दी पहावयास मिळत आहे. पाणी पुरवठा करणारी नळ योजनेचा बंद आहे. महिलांना शेत शिवारातील गढूळ अशुध्द पाणी आणावे लागत आहे.शासनाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्याने जुन्या गावठाणात काही प्रकल्पग्रस्तांना नविन गावठाणात भुखंड मिळाले नाही. त्यामुळे ते जुन्या गावातच वास्तव्यास आहेत. काहीना नविन पूनर्वसनात भूखंड मिळाले तर घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पुनर्वसनालाच लागुनच स्मशान भुमि दिली ती स्मशान भुमी दुसरीकडे लांब अंतरावर देण्यात यावी. पुनर्वसन संदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधी व शासनाला लेखी निवेदने करुन ही शासन कानाडोळा करीत आहे.पुनर्वसनात शासनाने अद्यापही सुविधाची पुर्तता न केल्याने प्रकल्पग्रस्त हलाखीचे जीवन जगत आहेत. एक ना अनेक समस्या गावठाण्यात असल्याने प्रकल्पग्रस्तांनी निवडणूकीवर बहिष्कार घातला आहे. येथील प्रशासन निद्रावस्थेत असल्यचा नागरिकांचा आरोप आहे. शासनाने खापरी सौंदळ, पुनर्वसनाची कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरीत केल्याने जिल्हा परिषदेने विद्युत बिलाचा भरणा करण्याची मागणी माजी सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते, प्रदीप गजभिये, सुरेश केवट, विनायक मेश्राम, नरेंद्र भुते, भाऊराव सेलोकर आदीनी केली आहे.पोलीस पाटलाचे पद भरागेल्या दिड वर्षापासुन सौंदळ व आठ महिन्यापासून सुरबोडी येथे पोलीस पाटलाची पद रिक्त असल्याने ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्राचे पुर्तता करतांना पोलिस पाटलाच्या दाखल्याची अट जाचक असल्याने विविध शासकीय योजनेचा लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तात्काळ दोन्ही गावाला पोलीस पाटीलाची पदे भरावी किंवा खापरी येथील पोलिस पटलाकडे प्रभारी पद दयावे अशी मागणी होत आहे.शासकीय भूखंडावर अतिक्रमणगावठाणात समोरील दुरदृष्टी कोण ठेवून शासनाने गाव विकासात्मक बांधकामासाठी भुखंड ठेवले आहेत मात्र गावातील काही अतिक्रमण धारकांनी भूखंडावर पक्के बांधकाम केले. अनेकदा संबंधितांना लेखी तोंडी सांगुनही शासन मात्र कानाडोळा करीत असल्याने अतिक्रमण धारकांचे दबंगीरी वाढली आहे. भविष्यात गावठाणात भूखंडाच राहिले नाही तर विकासाला ग्रहण लागणार आहे. महसुल विभाग मुंबई यांचे पत्रान्वये सदर जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे. अतिक्रमण काढणे संबंधितांची जबाबदारी असल्याचे कळवूनही संबंधित विभाग निद्रावस्थेत आहे.
सौंदळ, खापरी पुनर्वसनात पाणी समस्या पेटणार
By admin | Updated: February 27, 2017 00:29 IST