शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘त्या’ १५ गावातील पाण्याचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहे

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर दुबार संकट : बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : उन्हाची तीव्र दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला तालुक्यातील विहरी तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद पडले आहेत. विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहेतुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठण ठणात आहे त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहेलॉकडाऊनमुळे मजुराअभावी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी होतांना शेतकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदने उन्हाळी हंगामात ऊस व धानपिक शेतात लावले परंतु विहारी तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल. या विवंचनेत शेतकरी सापडला आहे दरम्यान आ राजू कारेमोरे यांच्या कडे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली असता कारेमोरे यांनी जिल्हाधिकारी यांना बावनथडी प्रकल्पाचे नदीत पाणी सोडण्यासंदर्भात ६ मे रोजी पत्र दिले आहे मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.पिकांना फटकानिर्सगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्री चा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात मात्र उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे. त्यावर शेती फिडरच्या भारनियमन मुळे शेतकऱ्यांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे कोविड -१९ कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी देशाला लॉक डाऊन करण्यात आल्याने सर्व जागच्या जागी थांबले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात