शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

धानाचे पऱ्हे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:24 PM

जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ८० मिमी पाऊस : अनेक तालुक्यात रोवणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात धानाची (भात पिकाची) लागवड केली जाते. मृग नक्षत्राची चाहूल लागताच बळीराजा शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ करत असतो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाऊस बरसताच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार पेरणी आटोपली होती. परिणामी पाऊस बरसल्यानंतर पऱ्हे रोवणीच्या अवस्थेपर्यंत आल्यामुळे रोवणीच्या कामालाही प्रारंभ केला होता. मध्यंतरी मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. सिंचन सुविधा असलेल्यांना दिलासा मिळाला असला तरी निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले.दुबार पेरणीनंतरही जवळपास दोन दिवस पाऊस न बरसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र रविवार मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे रोवणीच्या कामाला पून्हा दमदार सुरुवात झाली.गत २४ तासात जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. यात भंडारा, मोहाडी, पवनी, साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तालुकानिहाय आकडेवारीअंतर्गत भंडारा तालुक्यात ९१.६ मिमी, मोहाडी ११५.४ मिमी, तुमसर २३.२, पवनी ७७.६, साकोली ९४, लाखांदूर ८५.२ तर लाखनी तालुक्यात ७९.६ मिमी पाऊस बरसला. या सर्वांची सरासरी ८०.९ मिमी इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी उत्तम आहे.दरम्यान जिल्ह्यात संततधार पावसामुळे काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे तर काही ठिकाणी मातीच्या घरांची पडझड झाल्याचे वृत्त असले तरी नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पालांदूर : पालांदूरसह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारला त्याची १३३.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासाच्या हजेरी धानाचे बांदाण धानासहीत पाण्याखाली आले आहेत. नदी नाले किनारी गावकºयांना पोलीस व महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अख्ख्या विदर्भात पावसाची संततधार सुरु असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशाराभंडारा : भंडारा जिल्ह्यात १६ व १७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यानियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले. नागरिकांनी शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. पाणी असेल तेथून वाहन घेऊन जाण्यास टाळावे. पूर असताना नदी, नाला ओलांडू नये. पुलावरून पूराचे पाणी वाहत असताना दुचाकी, चार चाकी वाहने नेऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.