जलसाठा १३ टक्के : भीषण पाणीटंचाईचे संकेत, दोन मध्यम प्रकल्प कोरडेइंद्रपाल कटकवार भंडाराटँकरमुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याची पातळी खालावली आहे. सद्यस्तितीत जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु प्रकल्प व माजी मालगुजारी तलावांमध्ये सरासरी फक्त १३.१३ टक्के जलासाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही आकडे वारी निश्चितच पाणीटंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्ह्यात लघू पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत एकूण ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार प्रकल्पांमध्ये ४.२५८ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ९.९४ इतकी आहे. यामध्ये चांदपूरमध्ये असलेल्या पाण्ळाची टक्केवारी ६.१८१, बघेडा ५४़४९५ टक्के पाणी आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्पामध्ये पाण्यची टक्केवारी शुन्य आहे, हे येथे विशेष. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार यांचा समावेश आहे. या लघु प्रकल्पांमध्ये एकूण ७.४१३ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी १३.८५ इतकी आहे. ३१ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांमध्ये जलसाठा शुन्य टक्के आहे. २८ माजी मालगुजारी तलावात सध्यास्थितीत ४.३१५ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी १७ आहे. २८ माजी मालगुजारी नऊ तलाव कोरडे पडले आहेत.
प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावली
By admin | Updated: April 13, 2016 00:42 IST