शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : भंडारातील बाजारात कांद्याचे भाव ६० रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने विदर्भात सर्वत्र हाहाकार माजला आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. नवीन कांदा पावसात सापडला असून अनेक ठिकाणी काढणीही लांबणीवर पडली आहे. परिणामी, कांद्याचा भाव चढला असून, कांदा आता ६० रुपयाच्या घरात पोहचला आहे.भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होते.बाजारात थोड्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होत आहे. हा कांदा ६० रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. अनेक हेक्टरवर अजूनही कांद्याचे पीक आहे. ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. बाजारात व्यापाऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक आहे. जुना कांदा खराब झाला असल्याने व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र चांगल्या जुन्या कांद्याला भाव आला आहे.भंडारा येथील गंज बाजार तसेच मोठा बाजारमध्ये ठोक विक्रेत्यांशी संपर्क साधला असता, पांढरा कांद्याचे भाव वाढत असल्याने लाल कांद्याची मागणी तसेच विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. लाल कांद्याची मागणी पांढऱ्या कांद्याच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचे भाव कमी असल्यामुळे बाजारामध्ये लाल कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आला आहे. विशेष म्हणजे, मार्केटमध्ये पांढरा कांदा खराबच येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. एकंदरीत काद्यांच्या वाढलेल्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

टॅग्स :onionकांदा