शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

वैनगंगा धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:50 IST

आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाची उसंत : गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडले, पुजारीटोला आणि धापेवाडा प्रकल्पातून विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात संजय सरोवर, पुजारीटोला, कालीसराड व इडियाडोह या धरणामुळे पूर परिस्थिती निर्माण होवू शकते. धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा शहरानजीक कारधा येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजता वैनगंगा नऊ मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. रात्रीतून या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून कारधा येथे वैनगंगेची धोका पातळी ९.५ मीटर आहे.जिल्ह्यात नदीकाठावर १५४ गावे आहेत. या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान १३३० मीमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ६३६.८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्राधीकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे.दरम्यान पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १७ दरवाजे एक मीटरने तर १६ दरवाजे अर्धा मीटरने सायंकाळी ५ वाजता उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून सहा हजार ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी असून उपयुक्त जलसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी आहे. शुक्रवारी या जलाशयाची पातळी २४२.८५० मीटर मोजण्यात आली. तर उपयुक्त पाणीसाठा २६२.४६ दलघमी आहे.आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता. शुक्रवारी या पावसाने उसंत घेतली. मोहाडी तालुक्याकडे मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी दिसत आहे. येथे दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. अनेकांच्या शेतात रोवणीसाठीसुद्धा पाणी नाही. भंडारा तालुक्यातील मोहदुरा, खुर्शीपार पुलावर पुराचे सावट असून हा मार्ग काहीकाळ बंद होता.

टॅग्स :riverनदी