शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अड्याळवासी तालुक्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 8, 2015 00:32 IST

ब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता

निवेदन खितपत पडून : शासनाकडून अपेक्षाविशाल रणदिवे  अड्याळब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता. साकोली तालुक्यातील लाखनी व गोंदिया तालुक्यातील तिरोडा येथे सिनीयर बेसीक शाळा तेव्हा अड्याळमध्येसुध्दा त्या काळात ही शाळा होती. लाखनी तसेच तिरोडा यांना तालुका घोषीत केले आणि अड्याळला वगळण्यात आले. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी मागील २५ वर्षांपासुन मागणी आहे. गावपातळीवर शासकीय कामे एकाच ठिकाणी करता यावे, त्यापासून जनतेचा विकास साध्य करता यावा या हेतुने राज्य शासनाने केंद्रस्थानी असलेल्या गावाला महत्व देणे गरजेचे आहे. अड्याळ हे गाव पवनी तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या जवळपास २० हजार असून निवडणुकीला १० बुथ राहतात. बसस्थानक, पोलीस ठाणे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, दुरभाष केंद्र, डाक घर, ग्रामीण रुग्णालय, नायब तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा महाविद्यालय, संगणक प्रशिक्षण केंद्र यासह अन्य कार्यालये आहेत. निवडणुका आटोपताच लोकप्रतिनिधी म्हणून भरगच्च मतांनी निवडूनही आले; परंतु अड्याळला यायला वेळ नाही. हनुमान जयंतीचा उत्सव, रामनवमीला विवाह सोहळ्याला उशिरा का होईना भेट दिली. थोडा वेळ चर्चा म्हणून बैठक त्यातही शेकडो ग्रामस्थ व त्यापैकी एकाने ‘भाऊ आपला अड्याळ तालुका’ होईल का? उत्तर मिळाले, कृती समिती स्थापन करा, जमेलच तर एखादी मोर्चा काढा, असे सांगण्यात आले. निवडणुकां आधी याच अड्याळ गावातील मंचकावर ग्रामस्थांनी अनेकदा नेत्यांना तालुका निर्मिती करावी, म्हणून निवेदनही दिले. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात रॅलीमध्ये अड्याळ तालुका नक्कीच होणार असे म्हणणारे आज फार क्वचित दिसतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा अमुक कार्यक्रमाचे आयोजन केल्यासारखे आणि अड्याळ गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले जाईल. विषय एकच असतो बदल असतो मात्र देण्याऱ्यांच्या नावात आलेला असतो. एखादा उत्सव त्याचे अध्यक्षपद जसे बदलतात त्याप्रमाणे परंतु यानंतर अड्याळ तालुका झालाच पाहिजे, अशी ठिणगी पडलेली दिसते. यासाठी शिवसेनेचे संजु ब्राम्हणकर, राजु मुरकूटे यांनी शकडो ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा अड्याळ तालुका व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नुसते निवेदन दिल्याने तालुका होईल का? असे झाले तर आधी दिलेल्या शेकडो निवेदनांचे काय झाले? असा सवाल खितपत पडून आहे. माहितीनुसार महाराष्ट्रात नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसुल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. भंडारा जिल्हयातील अड्याळ तालुका होण्यासाठी निवडणुक काळात मोठमोठी आश्वासन दिली होती. त्यामुळे नविन तालुका निर्मिती यादीत आपला नंबर आहे की नाही हे सांगणार कोण? एका जिल्हा निर्मितीसाठी ३५० कोटी रुपये खर्च येतो अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे अड्याळ तालुक्याच्या तपशिलात अंदाजे २० कोटी रुपये खर्च सांगितला आहे. सर्व सुविधायुक्त होण्यासाठी हा किमान खर्च आहे. दर्जा मिळावा यासाठी गाव व परिसरातील जनतेत उत्साह आहे. परंतु शासनाला हा उत्साह, निवेदन दिसणार कधी, असा सावाल आहे.अड्याळला नायब तहसील कार्यालय आहेत. परंतु ते साहेब ठरलेल्या दिवशी मिळणारच याची शास्वती नाही. त्यामुळे इथे येणा-या ग्रामीण भागातील लोकांना पवनीला जावे लागते. आतातरी आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी अड्याळ ग्रमावासींयाकडून होत आहे.