शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

वैनगंगेचे पाणी नाग नदीने केले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:54 IST

जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीत नाग नदीच्या माध्यमातून दूषित पाणी पोहचत असल्याने नदीतिरावरील गावांमधील प्रदूषणाचा प्रश्न बिकट झाला आहे. भंडारा शहरासह अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागते. यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देसावधन : इकॉर्नियाचा विळखा, डीजेचे ध्वनी अन् रस्त्यावर वायू प्रदूषण

जागतिक पर्यावरण दिनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीत नाग नदीच्या माध्यमातून दूषित पाणी पोहचत असल्याने नदीतिरावरील गावांमधील प्रदूषणाचा प्रश्न बिकट झाला आहे. भंडारा शहरासह अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागते. यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. दुसरीकडे रस्ता बांधकामामुळे ठिकठिकाणी धुळीचे आणि लग्नवरातींच्या कर्णकर्कश डिजेमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. कायदे असले तरी कुणीही पुढाकार घेत नसल्याने या प्रदूषणावर कोणताही तोडगा निघत नाही.भंडारा जिल्ह्यातून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. वैनगंगेच्या खोऱ्यात अनेक गावे वसली आहेत. मात्र गत काही दिवसांपासून वैनगंगेचे पाणी भंडारा शहरानजीक दुषित होत आहे. नागपूर शहरातून वाहणारी नाग नदी भंडारा जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगेला मिळते. कारखान्याचे दुुषित पाणी वैनगंगेच्या पाण्यात मिसळले जाते. गोसेखुर्द येथे बांधलेल्या धरणामुळे पाण्याचा मोठा संचय असतो. या पाण्यात रसायनयुक्त पाणी मिसळते. भंडारा शहराची पाणी पुरवठा योजना वैनगंगेच्या तिरावर आहे. पर्यायाने नागनदीचे वैनगंगेत मिळसलेले दुषित पाणी प्राशन करावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. नागनदी स्वच्छतेसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर असला तरी गांभीर्याने हा विषय कुणी घेत नाही. परिणामी भंडारेकरांना नागपुरच्या रसायनयुक्त पाण्याचा मोठा फटका बसतो.भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ता बांधकाम सुरु आहे. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. धुळ मोठ्या प्रमाणात उडत असून श्वसनावाटे नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहे. तसेच अनेक वाहने रॉकेलवर धावत असल्याने त्याचेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. कारखान्यातून निघणाºया धुराचा तसा परिणाम होताना दिसत नाही. मात्र ध्वनी प्रदूषणाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. लग्नसमारंभातील डिजे आणि गर्दीच्या ठिकाणी हॉर्न ध्वनी प्रदूषणात वाढ करतात.सहा लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्टनिसर्गाची मुक्त उधळण असलेल्या भंडारा जिल्हा वनराजीने नटलेला आहे. मात्र अलिकडच्या काळात विकासाच्या नावाखाली वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. रस्ते बांधताना मोठाली वृक्ष तोडली जात आहेत. परंतु त्या ठिकाणी वृक्षारोपणाकडे कायम दुर्लक्ष होत आहे.सामाजिक वनीकरण विभागाने यावर्षी शतकोर्टी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात सहा लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात २८ लाख रोपे नर्सरीमध्ये तयार करण्यात आले आहेत. गावागावांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लावले जाणार आहेत.कन्या समृद्धी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लावले जाणार आहेत. मुलगी असलेल्या परिवाराच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार आहे. या अंतर्गत फळझाडे लावण्याचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यांच्या संगोपनाचे नियोजनही केले जात आहे. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.प्रशासन काय उपाय करतेय?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ध्वनी, वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवले जाते. कारखान्यातून निघणाºया धुरामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तत्पर असतो. जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याच्या धुरांड्यातून निघणारा धूर हा प्रक्रियेनंतरच बाहेर पडतो असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी सांगितले. वाहनाद्वारे होणाऱ्या प्रदूषणावर परिवहन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण मिळविले जाते. वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. शेतकºयांनी पालापाचोळा जाळू नये यासाठी जनजागृती केली जात आहे. पालापाचोळा जाळल्यामुळे धुराचे प्रदूषण वाढते तसेच नगरपरिषद क्षेत्रातील केरकचरा पेटवून न देता त्यांच्यावर प्रक्रिया करण्याची सक्ती करण्यात येते. मात्र यावर अद्याप पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. लग्न समारंभात वाजणाºया डिजेमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीचे प्रदूषण होते. परंतु याबाबत कुणी तक्रार करायला पुढे येत नाही. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. परंतु तक्रार येत नसल्याने कारवाई होत नाही. नागरिकांनी जागरुक राहून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ध्वनी, वायू प्रदूषण कसे कमी होईल यासाठी सहकार्य करावे असे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी सांगितले.भंडारा शहरासाठी ५७ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. लवकरच नागरिकांना या योजनेतून पाणी उपलब्ध होईल. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे २५ आरो बसविले जाणार आहेत. सध्या शहरात आठ ते दहा आरो सुरु झाले आहेत. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी न.प.सातत्याने उपाययोजना करीत आहे.- सुनील मेंढे, खासदारकारखान्याद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर आहे. जिल्ह्यातील कारखान्याच्या धुरांड्यातून निघणारा धुर हा प्रक्रियेनंतरच बाहेर निघतो. जिल्ह्यात कुठेही वायू प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यासाठी जनजागृती केली जाते.- आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषण