शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त अध्यक्षाची निवड केली मतदानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:40 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देप्रकरण दिघोरी मोठी येथील : ग्रामपंचायत निवडणुकीसारखे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय दिघोरीत येत असून मागील दोन वर्षापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे पार पडत आहे.२७ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यासंबंधाने चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने ९ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम एक तृतीयांश सदस्याची फेरबदल करण्यात आली. यानंतर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जापैकी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी महादेव कांबळे, सुभाष हटवार, मंगेश करंजेकर, सिध्दार्थ लोणारे व वसंत हटवार हे उमेदवार निवडणुकीसाठी ग्राह्य धरणात आले. मतदानाद्वारे पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय कमेटी बनविण्यात आली. यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून राहूल शिक्षण संस्थेचे सचिव मधुकर अंबादे यांनी काम पाहिले तर सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, पंचायत समिती सदस्य गुलाबराव कापसे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यामध्ये स्थान दण्ेयात आले.ठिकठिकाणी चर्चेला उधाणदिघोरीतील तंटामुक्त समितीच्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारख्या माहोल तयार झाला असून या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांनी मागील १५ दिवसापासून ओल्या पार्टीचे आयोजन केले. काही उमेदवारांनी नगदी स्वरुपात तर काहींनी घरगुती सामान सुध्दा मतदारांना वाटले असल्याचे दिसून आले.

महिलांना निंदणाची दुप्पट मजुरीआज निवडणुकीच्या दिवशी धानाच्या निंदणासाठी मजुरीवर गेलेल्या महिलांना ट्रॅक्टर, जि.प. आणि चारचाकी वाहनाद्वारे दुप्पट मजुरीचे पैसे देवून आपल्या बाजूने मत घालण्यासाठी आणण्यात आले. सदर प्रसंग पाहुण लोकशाही कुठल्या थराला जावून पोहचली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवड ही तळीरामासाठी पर्वणीच ठरली.

टॅग्स :Socialसामाजिक