शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेता संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल; तुमसरच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:33 IST

ऑडिओ क्लिप प्रकरण : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला होता. हा संवाद जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केला तसेच विरोधक यांच्याकडे व्हायरल केला. आमदार कारेमोरे यांची कोणतीही परवानगी न घेता संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून निलंबित करावे, असे निवेदन तुमसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (अजित पवार गट) जिल्हाधिकारी यांना, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांना सोमवारी दिले. या प्रकरणात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तुमसर नगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू मैदानावर जनसन्मान यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मैदानावर किमान सुविधांबाबत खात्री करण्याकरिता स्वतः पाहणी करून योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शहरातील प्रशासकीय प्रमुख्याने मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांची होती. मात्र मुख्याधिकारी वैद्य यांनी कार्यक्रमापूर्वीच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची साधी तसदीही घेतली नाही. 

याबाबत भ्रमणध्वनीवर आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी वैद्य यांच्याशी संपर्क साधला. नियोजनाबाबत तुम्ही काय केले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात मुख्याधिकारी वैद्य यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन कॉल बंद केला. शिष्टमंडळात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, यासीन छवारे, प्रदीप भरनेकर, सुमित मलेवार, सागर गभणे, जाकिर तुरक, गुलराजमल कुंदवानी, तोशल बुरुडे, नानू परमार, प्रवीण भुरे, रिंकू ठाकूर, जयंत पडोळे, वैभव शर्मा, पमा ठाकूर, जयश्री गभने, सरोज भुरे मीना गाढवे, शीला कारेमोरे, मिलिंद गजभिये, संकेत गजभिये, चंदन कामथे, राहुल बघेले, अक्षय गजभिये, एजाज कुरेशी, वसीम शेख, रीना मलेवार, प्रीती गभने, पूनम पाठक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्यथा आंदोलनाचा इशारा आमदाराची परवानगी न घेता संभाषण रेकॉर्ड करून त्या संवादाची क्लिप जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांवर पाठविली. तसेच ही क्लिप विरोधकांकडे पाठविली, असा आरोप करण्यात ॥ आला आहे. उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम गांभीर्याने न घेणे तसेच संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल करून शहरातील राजकीय वातावरण तापविणाऱ्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करून सेवेतून निलंबित करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा