भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी वाशिम येथून विनीता साहू या नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. त्या २०१० च्या तुकडीच्या त्या आयपीएस आहेत. सिंधूदुर्ग, नांदेड, वाशिम येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. ३ डिसेंबर रोजी झालेल्या आदेशानुसार झळके यांची बदली वाशिम तर साहू यांची बदली नाशिक येथे करण्यात आली होती. दरम्यान १४ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार विनीता साहू यांची भंडारा तर झळके यांची नागपूर येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली आहे. झळके यांची भंडाऱ्यातून तर साहू यांची २०१५ या वर्षात दोनदा बदली झाली आहे. यापूर्वी इतक्या कमी कालावधीत बदली झाल्याचे प्रकार घडलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
विनीता साहू नवीन पोलीस अधीक्षक
By admin | Updated: December 16, 2015 00:36 IST