शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशनचे अर्धवट बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST

Bhandara : आश्वासनानंतर १२ जूनचे आमरण उपोषण स्थगित, तामसवाडी गावातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तामसवाडीत जलजीवन मिशनचे काम अडल्याने गावकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही. योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल करण्यात आल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी पंचायत समितीसमोर १२ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दोन महिन्यांत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. लेखी आश्वासन मिळाल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे उपसरपंच अनिल वासनिक यांनी सांगितले आहे.

वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या तामसवाडीत नळकनेक्शन धारकांची मागणी ३५० कुटुंबांची आहे. गावात फक्त १५० कुटुंबीयांना नळकनेक्शन देण्यात आले आहे. या कुटुंबीयांना नळकनेक्शन देण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले. 

वारेमाप खर्चट्युब वेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करूनही पाणी मिळाले नाही. पंपिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहाच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले. पाणीपुरवठा करण्याच्या वितरण नलिकांवर ३९ लाख १७ हजार रुपये खर्च केले.

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्यागावागावांत जलजीवन मिशन कोरडाच आहे. यामुळे गावकरी संतापले आहेत. १२ जूनपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. निवेदनावर सरपंच सुनीता इटणकर, उपसरपंच अनिल वासनिक, वंदना अनकर, हिरा लांजेवार, रिता इखार, वंदना बनकर यांनी स्वाक्षरी केलेल्या होत्या. मात्र आता आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 

बैठकीत योजना पूर्ण करण्याचा निर्णय१० जूनला ग्रामपंचायत सभागृहात गावकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दोन महिन्यांत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता हर्षदीप बन्सोड, कनिष्ठ अभियंता महेश आगलावे, कनिष्ठ अभियंता विजय सिरसाम, कनिष्ठ अभियंता महेश शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सरपंच सुनीता इटनकर, उपसरपंच अनिल वासनिक, ग्रामसेवक बाहेवार यांच्यासह सदस्य व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater transportजलवाहतूक