शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

लसीकरणासाठी सरसावले गावपुढारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 5:00 AM

राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व तुमसर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. प्रथम गावपुढाऱ्यांना लसीकरणाची इत्थंभूत माहिती देत लसीकरणाबाबतचे गैरसमज नागरिकांमधून दूर करण्याचे आवाहन केले.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सलस घेतली की माणूस मरतो, किंबहुना अपत्यही होत नाही, अशी शंभर टक्के अफवा पसरलेल्या आदिवासीबहुल गावांत गावपुढाऱ्यांनी एकोपा दाखवित लसीकरणाच्या बाबतीत जनजागृतीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. तुमसर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासीबहुल गाव असलेल्या आलेसूर येथील गावपुढाऱ्यांसह ग्रामस्थांची सकारात्मक भूमिका काय साध्य करू शकते, ही बाब कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून दाखवून दिले. गावात ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, दुसऱ्या डोसच्या जनजागृतीसाठीही सर्वच सज्ज झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या हाकेला ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे. राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व तुमसर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. प्रथम गावपुढाऱ्यांना लसीकरणाची इत्थंभूत माहिती देत लसीकरणाबाबतचे गैरसमज नागरिकांमधून दूर करण्याचे आवाहन केले. गावपुढाऱ्यांनी एकमताने आश्वासन देत सहकार्य केले. यात गावातील एकूण पात्र लाभार्थींपैकी १८ वयोवर्षावरील २४ डिसेंबरपर्यंत १४५० नागरिकांनी पहिला डोस तर १३३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ९८ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी तुमसरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, गटविकास अधिकारी धीरज पाटील, आलेसूरचे सरपंच अंतकला श्याम राऊत, उपसरपंच रामचंद्र करमकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज सोनवाने, सुनील नरकंडे, मनोहर मरसकोल्हे, आशाताई वाघाडे, नेहा धुर्वे, कविता भोयर, जीवनज्योती कोरचे, प्रतीभा धुर्वे, विसराम धुर्वे, आशावर्कर रेखा कोरडे, सिंधू लोखंडे, शिक्षक राठोड, शेंडे, कापगते, उमेद कार्यकर्ता अरिवंद खेडकर, तलाठी एम.एन. कारेमाेरे यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहेत.  उल्लेखनीय म्हणजे, या बाबीची स्वत: जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दखल घेत गावपुढाऱ्यांची पाठ थोपटली व नागरिकांचे कौतुक केले.

आधी स्वत: घेतली लस

- आरोग्य विभागाच्या आवाहनानंतर प्रथम येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वत: लस घेतली. सरपंच ते सर्व सदस्य यात सहभागी झाले.  गावात फिरून त्यांनी ‘आम्हाला बघा, काहीच झाले नाही. लस घेतल्याने कुठलाही दुष्परिणाम होत नाही’, अशी जनजागृती केली. पोस्टर काढून ठिकठिकाणी गावात लावले. घरोघरी जाऊन नागरिकांचे मत परिवर्तन करण्यात आले. या प्रयत्नाने आज आलेसूरची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या