राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:12 PM2018-10-22T22:12:09+5:302018-10-22T22:12:28+5:30

उत्थान आणि उन्नतीसाठी समाजाला सिंचन करायला दोन डॉक्टरांनी शिकविले. डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मात्र आज समाजात वेगळे विचार पेरून वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

Vijaya Shashami and Arthar Puja Festival of RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

Next
ठळक मुद्देभंडारा व तुमसर येथे आयोजन : पथसंचलनाने वेधले लक्ष, योग, दंड यांचे चित्तथरारक प्रात्याक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्थान आणि उन्नतीसाठी समाजाला सिंचन करायला दोन डॉक्टरांनी शिकविले. डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मात्र आज समाजात वेगळे विचार पेरून वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यासर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजात समरसतेचा भाव निर्माण व्हायला हवा. हा भाव जागृत करण्याचे काम संघाची शाखा करीत असल्याचे मत रा. स्व. संघाचे प्रांत सह महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख प्रा. विजय राठोड यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव आज २१ आॅक्टोबर रोजी येथील दसरा मैदानात घेण्यात आला. यावेळी प्रा. राठोड प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख अतिथभ अर्जुन पोलीस अ‍ॅकेडमीचे संचालक रामचंद्र आगासे, जिल्हा संघ चालक रामभाऊ चाचेरे, नगर संघचालक अनिल मेहर उपस्थित होते. स्वयंसेवकांनी योग, दंड यांचे प्रात्याक्षिक प्रारंभी मान्यवरांसमोर करून दाखविले. वैयक्तिक गीत, सुभाषित आणि अमृतवचन झाले. पाहुण्यांचा परिचय नगर कार्यवाह रामकृष्ण बिसने यांनी करून दिला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रामचंद्र आगासे यांनी एखादी संघटना अविरतपणे नव्वद वर्ष आपले काम करीत असेल तर हे त्या संघटनेचे यश असल्याचे सांगितले. संस्कृती जतनाचे काम करणारा संघ भारताला परमवैभवावर नेण्याची क्षमता ठेवतो, असे सांगून संघातून मिळणारे संस्कारच समाजाची खरी ताकत असल्याचे यावेळी आगासे यांनी सांगितले.
आपल्या प्रमुख उद्बोधनात विजय राठोड यांनी संघ म्हणजे समाज व्यवस्थेचे चिंतन करणारी अनुभूती देणारे केंद्र असल्याचे स्पष्ट केले. समाज जातीपाती, धर्मात विभाग जातो म्हणून ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून संघटीत होण्याचा संदेश दिला, तेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या माध्यमातून डॉ. हेडगेवारांनी केले. अखंड समाज निर्मितीचे स्वप्न संघाचे असून समाज सहभागातून हे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. संघाचे कार्य हे ईश्वरीय कार्य असून चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज महापुरूष ही विविध जाती, धर्म, पंथात विभागले जात आहेत. समाजाच्या अखंडता आणि एकतेला हे बाधक असून समरसतेचा भाव समाजात निर्माण होणे महत्वाचे असल्याचे सांगताना संघ शाखा हे भाव समाजात रूजविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सव सुरू होण्यापूर्वी भंडारा नगरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले होते. मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांकडून पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उत्सवाला अनेक लोकप्रतिनिधी यांच्यासह नगरातील मान्यवर महिला, पुरूष मंडळी उपस्थित होते.
श्री जया उस्ताद गंज अखाडा व लायंस क्लब तुमसरचा उपक्रम
तुमसर : श्री जया उस्ताद गंज अखाडा शारिरीक शिक्षण मंडळ तुमसर व लायंस क्लब तुमसरला लितमच्या संयुक्त विधमानाने दसरा उत्सव, शस्त्र पूजन व सत्कार कार्यक्रम परमानंद पपुलवार, अध्यक्ष लायंस क्लब लालितम यांच्या अध्यक्षते खाली सत्कारमुर्ती मधुकर कुकडे संस्था अध्यक्ष/ खासदार भंडारा - गोंदिया व प्रमुख पाहुणे विक्रम साळी उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, कटरे माजी सैनिक यांचा उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफल देवून संस्था सचिव घनश्याम बडवाईक व उपाध्यक्ष शालिकराम गौरकर यांनी सत्कार केले. कार्यक्रमाला उपस्थित संस्था पूर्व अध्यक्ष मारोती लाटकर, तुलशिराम कुकडे, देवचंद निखाड़े, अशोक कुकडे, राजकुमार माटे, सीताराम जोशी, किशोर चौधरी, संजय केवट, गोपी बडवाईक, राजधर मलेवार, अनिल लाटकर, रोशन पिकलमुंडे, तुषार मलेवार, वासुदेव आगाशे, सचिन बडवाईक, कार्यक्रमाचे संचालन संस्था कोषाध्यक्ष गजानन लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्था सचिव बडवाईक यांनी केले.

Web Title: Vijaya Shashami and Arthar Puja Festival of RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.