कालीमाटी : येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेच्या कालव्यावर नुकतेच पूल तयार करण्यात आला. पण पुलाची अधिक उंची असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कालीमाटी ते सुपलीपार रस्त्यावरील पुलाची उंची काही महिन्यापूर्वी वाढविण्यात आली. पण त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. अद्याप या ठिकाणी ५ ते ६ अपघातांच्या घटना घडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पुलावरून मुरूम टाकण्यात यावे जेणेकरून रस्त्यावरून ये-जा करणे सोईस्कर होईल. या संदर्भात गावकऱ्यांनी वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेचे अभियंता तुरकर यांना कळवूनही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.सदर समस्येचे निराकरण करण्याची मागणी पिंटू बहेकार, कृष्णा चुटे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश हर्षे, दिलीप शेंडे, नेतराम कावळे, विजय चुटे व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
वाघ सिंचन विभागाचा पूल घेतोय बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2015 01:13 IST