शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

वैनगंगेच्या दूषित पाण्याचा नागरिकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:41 IST

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविण्यात येत असल्याने पाणी सिंचित राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाºया नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून फारच धोका निर्माण झाला आहे.नदी काठावरील गावचे गुरेढोरे, शेळ्या- मेंढ्या नदीतीलच पाणी पितात. परंतु दुषित पाण्यामुळे शेतकºयांना सुद्धा रोगराई निर्माण झाली आहे. सबब नदीकाठावरील गावचे लोक या दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले असून प्रत्येक माणसाचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेचे पाणी दूषित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपूर शहरातून वाहत येणाºया नाग नदीचे घाण व रासायनिक पाणी होय. सबब वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस रोगराईचा धोका निर्माण होत आाहे.मासोळ्यांचे उत्पादनात घटसंपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदी काठावरील ढिवर समाजाचे रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगेच्या पाण्यात जाऊ न देण्यासंबंधाने शासन स्तरावरून योग्य ती कारवाई तातडीने सुरु करावी. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जावू न देता ते पाणी शुद्ध करावे किंवा इतरत्र वळवावे, नदी काठावरील जनतेच्या आरोग्याचा तसेच शेतकºयांचे गुराढोरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.