शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात अधिकाऱ्यांची पदे रिक्त, जिल्हास्तरावरून पुर्तता होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:06 IST

Bhandara : १९ ऑक्टोबरपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे घोषणा केली. मात्र, तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यात खंडविकास अधिकारी हे प्रभारी असून, मोहाडी येथील तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे जरी तत्काळ रुजू झाले आहे. त्यामुळे भंडारा येथून काही अधिकारी निवडणुकीच्या कामाकरिता येणार आहेत.

आचारसंहिता लागू झाली. मंगळवारी सकाळपासून प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील राजकीय पक्षांचे व नेत्यांचे होर्डिंग काढण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत ११ ऑक्टोबरपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी दिली. 

सकाळी ११ वाजता तुमसर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तुमसर शहरात लागलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग काढायला सुरुवात केली होती. नियमानुसार आचारसंहिता घोषित झाल्यानंतर चोवीस तासांत शासकीय कार्यालयातील होर्डिंग, ४८ तासांत सार्वजनिक स्थळी लावलेले होर्डिंग व ७२ तासांत खासगी इमारतीवरील लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यात येतात. 

बुधवारपासून सर्व होर्डिंग्स तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी निकाळजे यांनी दिली. या संदर्भात यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. 

वयोवृद्ध मतदारांकरिता घरूनच मतदानाची सोय करण्यात आली आहे, तसेच मतदान केंद्रावर सर्व सोईसुविधा उपलब्ध राहणार आहेत. तुमसर मतदारसंघात २,१४४ इतक्या मतदारांची वाढ झाली असून, त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. तुमसर तहसील कार्यालयात मंगळवारी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार जांभुळकर, पेंदाम व खोकले उपस्थित होते. 

यंत्रणा अलर्ट मोडवरराज्याच्या शेवटच्या टोकावरील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली.

टॅग्स :tumsar-acतुमसरbhandara-acभंडारा