शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गुणवत्ता आली धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:22 IST

Bhandara : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी :शिक्षणाचा गाजावाजा होत असतानाही जिल्हा परिषदेच्या व अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही शाळांमध्ये चार वर्ग एका शिक्षकाकडे, तर काही शाळांमध्ये मुख्याध्यापकाचीही पदे रिक्त असल्याने शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न समाजात उपस्थित झाला आहे.

खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. काही शाळांमध्ये शालेय कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे शिक्षक प्रतिमहिना फक्त ४-५ हजार रुपये मिळवून, आर्थिक झळ सोसत आहेत. विद्यार्थी प्रवेश, शाळेचा खर्च, तात्पुरती शिक्षक नियुक्ती व इतर खर्च भागवण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची प्रथा सुरू आहे.

अनेक गावांमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन व शाळेला टाळे लावण्याची घटनाही घडत आहेत. शिक्षक भरती बंद असल्यामुळे अनेक वर्षापासून शाळांमध्ये एकही नवीन शिक्षक नियुक्त केला गेला नाही. शिक्षकांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. तसेच अधिकारी वर्गाची देखील पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी प्रभारावर आहेत. तसेच ६२ मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागातील रिक्त पदाचा आकडा फुगला असला तरी ते पदे कधी भरणार हा मोठा प्रश्न आहे.

राज्यातीकल शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरूया पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षक भरतीला मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे १० टक्के पदे रिक्त असून, सुमारे साडेचार हजार शिक्षकांची भरती होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पंधरा दिवसात सुरू होणार असल्याची माहिती आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू असून, जिल्ह्यातील अनेक रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरीही तात्पुरत्या नियुक्ती व शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा प्रभाव पडत आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षणTeachers Recruitmentशिक्षकभरती