शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा तुटवडा : 'लिंकिंग'च्या बेकायदेशीर अटींमुळे शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:34 IST

शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी : युरिया मिळविण्यासाठी होतोय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताच्या टंचाईने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. धान लागवडीसाठी अत्यावश्यक असणारे युरिया मिळविण्यासाठी शेतकरी एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात धाव घेत आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी विक्रेते 'युरिया हवा असेल, तर डीएपी, एनपीके किंवा सूक्ष्म खतेही' घ्या अशी बेकायदेशीर अट घालत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च व आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे.

शासकीय दरात २६६ रुपयांना मिळणारी युरिया खताची बॅग आता टंचाईमुळे अनेक ठिकाणी ३०० ते ४०० रुपयांना विकली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच लिंकिंगच्या या बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना गरज नसलेल्या इतर खतांची जबरदस्तीने खरेदी करावी लागत आहे.

पिकांची वाढ, उत्पादनावर परिणामाची शक्यतायुरियाच्या तुटवड्यामुळे धान रोवणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अडचणी वाढल्या आहेत. खत वेळेवर न मिळाल्यास धान पिकाची वाढ खुंटण्याची व उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे..

कडक तपासणी व कठोर कारवाईची अभावखत नियमन आदेश, १९८५ प्रमाणे कोणतीही दुकान किंवा विक्रेता खतांसोबत दुसरे खत विकायला भाग पाडू शकत नाही. मात्र, प्रत्यक्षात कृषी विभागाकडून कडक तपासणी अथवा कारवाई होत नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. कठोर कारवाईची मागणी होत आहे.

तक्रार करण्यास कुणीही समोर येईनात

  • अनेकदा शेतकऱ्यांकडून तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे खत व लिकिंगसंबंधी तोंडी तक्रारी केल्या जातात. परंतु, लिखित तक्रारी करण्यास शेतकरी धजावत नाही. तसेच लिंकिंग होत असल्याची ओरड दुकानदारांकडून नेहमी केली जाते.
  • मात्र, कंपन्यांविरोधात तक्रार करण्याचे धाडस दुकानदार दाखविताना दिसत नाही. त्यामुळे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या कारवायांना अडचणी येतात.
  • शेतकऱ्यांनी न घाबरता गैरप्रकार तर करणाऱ्या दुकानदाराविरोधात, दुकानदारांनी लिंकिंगसाठी दबाव टाकणाऱ्या खत कंपन्यांविरुद्ध उभे ठाकले पाहिजे, तरच समस्या संपतील.

२६६₹ ची युरियाची बॅग विकली जात आहे ३०० रुपयांनाजिल्ह्यात चार कृषी केंद्रांवर १० ते ३० दिवसांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून परवाने निलंबनाच्या कारवाया झाल्यात. परंतु, लिंकिंगची समस्या कायम आहेत.

"जिल्ह्यात युरिया खताच्या टंचाईवर मात करण्यासाठी यापूर्वीच बफर स्टॉक खुला केला आहे. लवकरच युरिया खताच्या दोन रॅक जिल्ह्यात उतरणार आहेत. गरज पडल्यास पुन्हा उर्वरित बफर स्टॉक खुला केला जाईल."- किशोर पात्रीकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराFertilizerखते