लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरीत जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच ढगाळ वातावरण असल्यानंतर सायंकाळी पाच वाजता वादळी वारा व गारांसह पाऊस बरसला. उन्हाळी धानासह भाजीपाला व बागायती शेतीला फटका बसला आहे.भंडारा शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस बरसला. मात्र त्यानंतर उन्हाची दाहकता वाढली. दुपारी ३ वाजतापासून वातावरणात बदल जाणवला. आकाशात मेघ दाटून आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. क्षणातच पाऊसही बरसला. या पावसामुळे उकाळ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शहापूर परिसरातही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला.मोहाडी तालुक्यातही सुसाट वादळ, वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आंधळगाव व मोहाडी तालुक्यातही पाऊस बरसला. करडी, पालोरा परिसरातही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने कवलारू घरांचे नुकसान झाले. लोहारा येथेही पाऊस बरसल्याची वार्ताहराने सांगितले. तुमसर शहरासह पाऊस बरसला. यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक थोड्यावेळासाठी प्रभावित झाली.लाखांदूरसह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. दिघोरी मोठी येथेही वादळी पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजूरांची या पावसामुळे चांगलीच कुचंबना झाली. कापणीला आलेले धानही जमिनदोस्त होण्याची भीती आहे. तालुक्यातील बारव्हा परिसरातही पाऊस बरसला. लाखनी व साकोली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथेही सायंकाळी ६ च्या सुमारास पाऊस बरसला. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.पवनीत निर्माणाधीन मूर्ती कोसळलीयेथील प्रसिद्ध पराकोटच्या पायथ्याशी असलेल्या बालसमुद्र तलावालगत चंद्रवणी विहारावर बुद्ध मूर्ती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. मात्र जोरदार वादळी वाऱ्यामुळे निर्माणाधीन बुद्ध मूर्ती कोसळली. यामुळे समितीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहेत. खासदार प्रफुल पटेल यांनी व समितीने गोळा केलेल्या लोकवर्गणीतून बुद्धमूर्तीचे निर्माण कार्य सुरू होते. यास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर उत्खननात सापडलेले सम्राट अशोककालीन जगन्नाथ स्तुपाचे स्थळ आहे. त्यामुळे या स्थळाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST
भंडारा शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस बरसला. मात्र त्यानंतर उन्हाची दाहकता वाढली. दुपारी ३ वाजतापासून वातावरणात बदल जाणवला. आकाशात मेघ दाटून आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. क्षणातच पाऊसही बरसला. या पावसामुळे उकाळ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शहापूर परिसरातही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातही सुसाट वादळ, वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस
ठळक मुद्देउन्हाळी पिकांची नुकसान : उकाळ्यापासून नागरिकांची सुटका