शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

युनिव्हर्सल कारखाना टाकणार कात?

By admin | Updated: November 30, 2014 22:58 IST

केंद्र शासनाने तात्काळ निर्णय व धोरण या तत्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याने आजारी कारखान्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरोला अकरा

उद्योगपती इच्छूक : कारखाना विक्रीच्या हालचाली सुरुतुमसर : केंद्र शासनाने तात्काळ निर्णय व धोरण या तत्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याने आजारी कारखान्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरोला अकरा वर्षाने पुन्हा अच्छे दिन येत असल्याची माहीती आहे. महावितरण, बीआयएफआय महसूलची ग्रहणे सुटली असून देशातील नामवंत उद्योगपतींनी हा कारखाना खरेदी करण्याच्या हालचाली सुरु केल्याची माहीती आहे.वैनगंगा नदी काठावर माडगी (तुमसर) येथे मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना युनिव्हर्सल फेरो अलाईड अ‍ॅन्ड केमीकल्स लिमिटेड हा कारखाना मागील ४० वर्षापूर्वी सुरु झाला होता. कारखाना व्यवस्थापन व महा वितरण कंपनीत थकीत वीज बीलाचे प्रकरण दिल्ली येथील बीआयएफ मंडळापुढे प्रलंबित होता. या कारखान्याकडे महावितरणाचे २५० कोटी वीज बीलाचे थकीत होते. थकीत वीज बीलाचा गुंता येथे नुकताच संपल्याची माहीती आहे. अभय योजनेअंतर्गत हा गुंता संपला. महसूल विभागाचे प्रकरणही संपले. कामगारांचा गुंता अंतीम टप्प्यात आहे.कारखान्याची विक्रीकंपनी मालकांनी हा कारखाना विक्री काढल्याची विश्वसनीय माहीती आहे. मागील चार महिन्यात देशातील नामवंत उद्योगपतींचे शिष्टमंडळ येथे येऊन गेले. यात जिंदल स्टील अ‍ॅन्ड पॉवर, सनफ्लॅग आयर्न अ‍ॅन्ड स्टील, रायपूर येथील सारडा स्टील, हिरा स्टील, आधूनिक मेटल वंदना स्टील येथील वरिष्ठ अधिकारी या कारखान्याला भेटी देऊन गेले. ३०० एकर परिसरात वैनगंगा नदी काठावर हा कारखाना असून सर्व मूलभूत सोयीसुविधा येथे उपलब्ध आहेत. कामगार तथा अधिकाऱ्यांच्या सदनिका, शाळा, रुग्णालय, रेल्वे ट्रॅकची सुविधा आहे. हा कारखाना खरेदी इच्छूक उद्योगपतींकडे स्वत:चे पॉवर प्लांट आहेत. सध्या मॅग्नीज शुद्ध करणाऱ्या कारखान्याकडे पॉवर प्लांट असणे आवश्यक आहे. वीजपूरवठा २४ तास असणे व महागडी वीज खरेदी करणे विद्यमान कारखाना मालकाला परवडणारे नाही. त्यामुळेच कारखाना विक्रीचा निर्णय येथे घेण्यात आला अशी माहीती आहे. या कारखान्यात १२०० कामगार कार्यरत होते. येथील मॅग्नीजला देश विदेशात मोठी मागणी होती. आजारी व भंगारात निघालेल्या कारखान्याकडे ३०० एकर जमिनी पडून होती. संसदीय समितीची अशा कारखान्यावर करडी नजर होती. (तालुका प्रतिनिधी)