शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार चेकपोस्टच्या चौकीत शिरली; पोलीस उपनिरिक्षकासह दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:33 IST

भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर खरबीनाका येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात चेक पोस्टवरील आरोग्य कर्मचारी व इतर पोलिस थोडक्यात बचावले.पोलीस उपनिरिक्षक विवेक राऊत (जवाहरनगर पोलीस ठाणे) व पोलीस शिपाई ननीर (पोलीस मुख्यालय) अपघातात जखमी झाले. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना भंडाराच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील खरबीनाका येथे चेकपोस्ट तयार करण्यात आला आहे. या चेक पोस्टवर आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी वाहनांची तपासणी सुरू होती.त्यावेळी नागपूरवरून एक भरधाव कार आली. तिला थांबण्याचा इशारा केल्यानंतरही ही कार थांबली नाही. तर अनियंत्रित होऊन कार थेट येथे उभारलेल्या पोलीस चौकीला धडक देऊन लगत असलेल्या नालीत जाऊन थांबली. अपघातात पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत आणि पोलिस मुख्यालयातील शिपाई ननीर जखमी झाले. याठिकाणी असलेले वैद्यकीय कर्मचारी व पोलिस अधिकारी थोडक्यात बचावले. कार नालीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला. सदर कार आयुध निर्माणी कर्मचाºयाची असून ते नागपूरहून जवाहरनगर येथे जात असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जवाहरनगर पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघात