शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

रोहातील सिलिंग जमिनीची अनधिकृत विक्री

By admin | Updated: June 9, 2014 23:28 IST

रोहा येथील तलाठी साझा क्रमांक १६ गट क्रमांक १३६८ व १३३२ मधील शासकीय जमीन सिलिंग कायद्यांतर्गत गावातील नागरिकांना देण्यात आली होती. मात्र मिळालेल्या शेतजमिनीची अनधिकृतरीत्या

करडी (पालोरा) : रोहा येथील तलाठी साझा क्रमांक १६ गट क्रमांक १३६८ व १३३२ मधील शासकीय जमीन सिलिंग कायद्यांतर्गत गावातील नागरिकांना देण्यात आली होती. मात्र मिळालेल्या शेतजमिनीची अनधिकृतरीत्या विक्री करण्यात आली. प्रकरणी चौकशी करून जमीन शासन जमा करावी, दोषींवर कायद्यानुसार कारवाई करून भूमिहिनांना जमिनीचे वाटप करण्याची सरपंच बिसन सपाटे यांनी तहसीलदार मोहाडी यांना निवेदनातून केली आहे. यापुर्वीही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र कारवाई झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.मोहाडी तालुक्यातील मौजा रोहा तलाठी साझा क्रमांक १६ गट क्रमांक १३६८ व १३३२ ही शासकीय जमीन सिलिंग कायद्यानुसार अंदाजे सन १९६0 च्या सुमारास गावातील रामा गणेश उरकुडे व देवलाबाई दादू खोब्रागडे यांना मिळालेली होती. सिलिंगमध्ये मिळालेल्या जमिनीची विक्री करण्याचे अधिकार जमीन ज्योत करणार्‍या व्यक्तींना नाही, असे असताना उपरोक्त गटातील जागेची विक्री केली गेली. विक्रीपत्र झालेले आहे. त्यामुळे विक्रीपत्र करून घेणार व देणार दोघेही दंडास पात्र ठरतात आणि सदर जागा सरकारजमा केली जाते, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. निवेदनातही तसे नमूद केले आहे. सदर जागेची अनधिकृतरित्या विक्री झालेली आहे. रोहा गावातीलच विलास ताराचंद बांडेबुचे, उमेश ताराचंद बांडेमुचे, संतोष ताराचंद बांडेबुचे व सदाशिव दोडकू चोपकर यांनी सिलिंग जमिनीची खरेदी केली आहे. एवढेच नाही तर सातबारा व नक्कल हिस्सा नं. ४ मध्ये खरेदीमुळे असे लिहून खरेदीदारांची नावे चढविलेली आहेत. सिलिंग जमिनीची अनधिकृरित्या खरेदी विक्री करण्यात आली. विक्रीपत्र करण्यात आले. प्रकरणी सखोल चौकशी करावी, विक्री झालेली शेतजमीन शासन जमा करून खरेदीदार व विक्रेत यांच्यावर कारवाई करून दंड करण्यात यावा तसेच जमीन भूमिहिनांना अनुदानावर देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सरपंच बिसन सपाटे यांनी दि. ३0 मे रोजी तहसीलदार मोहाडी यांना दिले आहे. ठेक्याचे बाँड पत्र का लिहिले नाही?ग्रामपंचायत कार्यालय रोहा यांनी दि. २0 फेब्रुवारी २0१४ रोजी तहीलदारांकडे उपरोक्त सिलिंग जमिनीसंबंधी तक्रार केली होती. त्यानुसार महसूल विभागाचे काही अधिकारी मौक्यावर आले होते. जमीन खरेदीदार विलास बांडेबुचे व संतोष बांडेबुचे त्यावेळी मौक्यावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना आम्ही जमीन खरेदी केली नाही ती जमीन आम्हाला ४0 वर्षापासून ठेक्याने आहे असे सांगितले. परंतु ठेक्याच्या जमिनीचा प्रत्येकवर्षी बाँड लिहिला जातो. तो बाँड खरेदीदारांनी का लिहून घेतला नाही असेल तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान सरपंचांनी तक्रार निवेदनातून केले आहे. गट क्रमांक १५२८ केव्हाचे?मौजा रोहा येथील गट क्रमांक १३६८ व १३३२ या सिलिंग जमिनीच्या बाजूला सरकारी पडीत असलेल्या जमिनीवर विलास बांडेबुचे व उमेश बांडेबुचे, संतोष बांडेबुचे यांनी जबरनजोत करून ताब्यात घेतली आहे. त्या जमिनीवर गट क्रमांक १५२८ निर्माण करून सातबारा तयार केला आहे. सदर १५२८ गट क्रमांक विलास बांडेबुचे यांचे नावाने तयार झालेला आहे. रोहा येथे सिलिंग जमिनीची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍याचे खिसे गरम झाले असावे, अशी शंका उपस्थित करीत १५२८ गट क्रमांक केव्हा व कसे तयार केले गेले याची सखोल चौकशी करावी, शेतजमिन सरकार जमा करून भूमिहिनांना देण्यात यावी अशी मागणी सरपंच बिसन सपाटे यांनी केली आहे. शिवीगाळ व मारण्याची धमकीरोहा येथील सिलिंगमध्ये मिळालेल्या शेतजमिनीचा पंचनामा करण्यास ग्रामपंचायत कमेटी व अन्य कमेटीचे लोक मौक्यावर गेल्यास मोठय़ा प्रमाणात अनधिकृतरित्या जमीन खरेदी करणार्‍या इसमांकडून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली जाते. तरी योग्य कारवाई करून न्याय देण्याची मागणी तहसीलदार मोहाडी यांचेकडे सरपंच बिसन सपाटे यांनी केली आहे. (वार्ताहर)