शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयात विनापरवानाधारकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:32 IST

चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग बेखबर आहे.

ठळक मुद्देनागपूर, भंडाऱ्याचे व्यापारी सक्रिय : मासेमारी परवानाधारकांच्या नावावर मासोळ्यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग बेखबर आहे.यंदा मार्च २०१८ मध्ये जलाशयात मत्स्यपालन व मासेमारी करण्याची मुदत संपली आहे. मत्स्यपालन संस्थेच्या ताब्यात असणारी जलाशयातील मासेमारी मत्स्यपालन विभागाचे नियंत्रणात आली आहे. राज्य शासनाने नविन विविध योजनांअंतर्गत जलाशयातील मत्स्यपालन आणि मासेमारी करण्याचे कंत्राट प्रक्रियेला अद्याप मंजुरी दिली नाही. यामुळे गाव स्तरावरील मत्स्यपालन संस्थाचे रोजगार गडगडले आहे. चांदपूर जलाशयात असणारे नियंत्रण नसल्याने मासेमारी करण्याची प्रक्रिया मत्स्यपालन विभागाने सुरु केली आहे. मासेमारांना महिनाभराचे परवाने वितरीत करण्यात आली आहेत. ५०० रुपये दरात मासेमारांना रोजगार उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागात मासेमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मासेमारीतून उदरनिर्वाहाचा साधन मिळाला आहे. जलाशयात परवाना धारकांनाच मासेमारीची मंजुरी मिळाली असून त्यांनीच जलशयात जाळे घालण्याची अधिकृत मंजुरी आहे. परंतु सध्या जलाशयात विना परवानाधारक मासेमाराचा जमावडा तयार झाला आहे. नागपूर, भंडाराच्या व्यापाºयांनी या जलाशयात धुडगुस सुरु केला आहे. त्यांचे एजंट या जलाशयात सक्रीय झाली आहे. परवानाधारकांच्या नावावर विना परवानाधारक मासोळयाची चोरी करीत आहेत. या जलाशयातील मासोळयाची विक्री व्यापाºयाना करण्यात येत आहेत. या जलाशयात मत्स्यपालन विभागाचे नियंत्रण असले तरी, २४ तास नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. यामुळे व्यापारी मालामाल होतांना दिसत आहे. मत्स्यपालन विभाग परवाने प्राप्त मासेमार या जलाशयात मासेमारी करीत असल्याचे सांगत असले तरी, विना परवानाधारक मासोळयाची चोरी करीत असल्याचे नाकारत नाही. यामुळे जलाशयात आलबेल प्रकार सुरु आहेत.स्थानिकांना रोजगार आणि उदरनिर्वाह करणाºयासाठी परवाना देण्याचा निर्णय विभागाने घेतला असला तरी व्यापाºयाचे एजंट अधिक विना परवान्याने मासेमारी करित असल्याचे कुणी नाकारत नाही. दरम्यान जलाशयात बेधडक मासेमारीचे प्रकार सुरु आहेत. परंतु नव्याने मत्स्यापालन करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही महिन्यात मासेमारी अडचणीत येणार आहे.या संस्थेकडे जलाशयात मासेमारी आणि मत्स्यपालनाचे कंत्राट होते. या संस्थेचे २०० हून अधिक सभासद आहेत. परंतु संस्थेचे कंत्राट मुदत संपल्याने या सभासदाचे उदरनिर्वाह अडचणीत सापडले आहे. त्यांचा रोजगार हिरावला आहे. भलत्याच व्यापाऱ्यांचे अधिकारया जलाशयात निर्माण झाले आहे. मत्स्यपालन आणि मासेमारीचे कंत्राट देणारी प्रक्रिया खोळबंल्याने स्थानिकांवर अन्याय सुरु झाला आहे. या जलशयाचे मासेमारीत मत्स्यपालन विभाग सर्वेसर्वा आहे. यामुळे या विभागला नियंत्रण ठेवतांना अडचणीचे ठरत आहे. या जलाशयात कुणीही या आणि मासेमारी करा, असे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Damधरण