शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

चांदपूरच्या जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय

By admin | Updated: February 4, 2016 00:34 IST

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात असलेल्या विस्तीर्ण जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे.

संस्था अध्यक्षांचा प्रताप : पर्यटकांचे जीव धोक्यात, पाटबंधारे विभाग निद्रिस्तरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात असलेल्या विस्तीर्ण जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. मत्स्यपालन संस्थेच्या अध्यक्षांनी या व्यवसायाची सुरुवात केल्याची माहिती मिळाली असून पर्यटकांचे जीव धोक्यात आले आहे. यात पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी असल्याचे आरोप होत आहेत.सिहोरा परिसरातील ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाची जिल्ह्यात नंदनवन म्हणून ओळख आहे. या पर्यटनस्थळाला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गेल्या आॅगस्ट २०१२ पासून पर्यटनस्थळ बंद करण्यात आला आहे. या पर्यटनस्थळावरून कंत्राटदारांचे नियंत्रण संपताच अनधिकृत व्यवसाय धारकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पर्यटनस्थळात असणाऱ्या ३२८ हेक्टर आर जागेतील विस्तीर्ण जलाशयात वर्षभर पाणी राहत आहे. या जलाशयात आधी बोटिंग व्यवसायाची मंजुरी कंत्राटदाराला देण्यात आली होती. जलाशयातील बोटिंग पर्यटकांना भुरळ घालणारी होती. परंतु पर्यटनाची लिज संपताच बोटिंग व्यवसाय बंद करण्यात आलेला आहे. तर बोटिंग साहित्याची नासधूस झाली आहे. परंतु पर्यटनस्थळ बंद झाले असतानाही पर्यटकाची हजेरी पर्यटनस्थळात सुरुच आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी जलाशयात अनधिकृत बोटींग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. या व्यवसायाकरिता २ लाख खर्चून नागपूरहून डोंगा खरेदी करण्यात आलेला आहे. या डोंग्यात डिझेल इंजिन लावण्यात आलेला आहे. प्रती व्यक्ती ३० रुपये प्रमाणे बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. ३५ फूट खोल या जलाशयात अप्रशिक्षित तरुण पर्यटकांची भ्रमंती करीत आहेत. रोज १००-१५० पर्यटक या बोटिंग मध्ये जलाशयात भ्रमंती करीत असल्याने पर्यटकांचे जीव धोक्यात आले. गेल्या सहा महिन्यापासून भरदिवसा हा अनधिकृत व्यवसाय सुरु असताना नियंत्रण ठेवणाऱ्या पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी आहो. या व्यवसायात नागपूरचे काही व्यवसायीक गुंतले असल्याची माहिती मिळाली आहे.या जलाशयात मासोळी उत्पादनाला मंजुरी देण्यात आली असून चांदपूरच्या मागासवर्गीय मत्स्यपालन सहकारी संस्थेला लिजवर देण्यात आले आहे. या संस्थेच्या अध्यक्षांनी अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात ३-४ अस्थायी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान जलाशयात सुरु असलेल्या या जीवघेण्या बोटिंग व्यवसायाची माहिती मिळताच संस्था अध्यक्षांना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांनी चांगलेच खडसावले आहे. जलाशयात अनधिकृत व्यवसाय व बोटिंग व्यवसायाला बंदी असताना नियम झुगारण्यात येत आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी या आशयाची संस्था अध्यक्षांना नोटीस बजाविण्यात आली आहे. परंतु नोटीसाला पायदळी तुडविण्यात आले आहे. मासेमारी करण्यासाठी जलाशयात डोंगा भ्रमंतीला मंजुरी असली तरी बोटिंग व्यवसायासाठी डोंगा हायटेक करण्यात आल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाने आठवडाभर कर्मचारी जलाशयात परिसरात नियुक्त केले आहे. काही दिवस बोटिंग व्यवसाय बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कमतरतेचे कारण पुढे करून कर्मचाऱ्याचे नियंत्रण हटविण्यात आले आहे. यामुळे पुन्हा बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. रोज ५०-६० पर्यटक या बोटिंग मध्ये जलाशयात भ्रमंती करीत आहे. शासन स्तरावर मंजुरी नसताना राजरोसपणे पर्यटकांना जलाशयात भ्रमंती केली जात आहे. या आधी जलाशयात प्राणहानी झाली आहे. अनेकांचा बुडून मृत्यू झाला. परंतु अनधिकृत बोटिंग व्यवसायावर बंदी घालण्यात आली नाही. अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु असताना डोंगा जप्तीची कारवाई झाली नाही. यामुळे पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी असल्याचे दिसून येत आहे. या जलाशयात कर्मचारी हजेरी लावण्याचे कळताच जलाशयात अन्य भागांकडे डोंगा वळता करण्यात येत आहे. मासोळी उत्पादन व मासेमारी करण्याचे अधिकार असताना संस्था अध्यक्षांनी बोटिंग व्यवसाय थाटला आहे. या शिवाय जलाशयात पर्यटकांच्या जीवाचा खेळ मांडला आहे. यामुळे या व्यवसायासह पाटबंधारे विभागाची यंत्रणा अडचणीत आली आहे. साटेलोटे असल्याचे आरोप होत आहे. अनधिकृत बोटिंग व्यवसाय बंद करण्याची मागणी आहे.जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास येताच संस्था अध्यक्ष यांना जबाबदार धरण्यात आले असून व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.- वाईन देशकर, शाखा अभियंता, डावा कालवा पाटबंधारे विभाग सिहोरा.बोटिंग व्यवसायासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला असून पर्यटकांच्या आग्रहास्तव जलाशयात डोंग्यातून भ्रमंती करण्यात येत आहे.- शांताराम शहारे, अध्यक्ष मत्सपालन संस्था चांदपूर.