शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार, पवनी वैनगंगा नादीपुलावरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:21 IST

घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- देवानंद नंदेश्वर 

भंडारा : पवनी येथून भेंडाळा (चौ.) कडे जात असताना दुचाकी धानाचे पोते भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. यात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास पवनी नजिकच्या वैनगंगा नदी पुलावर घडली. पियुष गजानन राजभोयर (१७, भेंडाळा) व निलेश श्रीपत मेश्राम(२४, दहेगाव), अशी मृत युवकांची नावे आहेत.

भेंडाळा(चौ) येथे रविवारी मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उत्सव बघण्यासाठी निलेश मेश्राम हा भेंडाळा येथे सोनटक्के यांचे घरी पाहुणा म्हणून आला होता. तो गजानन राजभोयर याचा मित्र होता. सायंकाळी दोघेही पवनीला दुचाकीने गेले होते. कामे आटोपून गावाकडे परतत असताना वैनगंगा नदी पुलावर उभ्या असलेल्या गुड्डू रघुते रा. कुर्झा यांच्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. यावेळी दोघांनाही गंभीर दुखापत झाली. 

ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक निखिल राहाटे करीत आहेत.

पुलावर स्ट्रीट लाईटची गरजपुलावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याला पुलावरील अंधार कारणीभूत ठरत आहे. ट्रॅक्टरला इंडिकेटर व रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वारास ट्रॅक्टर दिसले नाही व त्यांचा करूण अंत झाला. पुलावर प्रकाशाची व्यवस्था असती तर कदाचित अनर्थ टळला असता? म्हणून प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन वैनगंगा नदी पुलावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था लावण्याची मागणी प्रवासी जनतेनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात