शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
5
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
6
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
7
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
8
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
9
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
10
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
11
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
12
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
13
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
14
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
15
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
16
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
17
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
18
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
19
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
20
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वाहनाला धडकले, मागच्या कारने चिरडले रोजगारासाठी नागपूरकडे निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 31, 2025 21:02 IST

राष्ट्रीय महामार्गवरील उकारा फाट्यावर भीषण अपघात

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर साकोलीजवळील ऊकारा फाट्याजवळ शनिवारी दुपारी ३:०५ वाजताच्या सुमारास एका विचित्र आणि दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची दुचाकी पुढील वाहनाला धडली. दुर्दैवाने मागून येणाऱ्या कारने या दोघांनाही चिरडले. मृतांमध्ये यादवराव गोपालराव वघारे (३६, आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (२८, मोहनटोला, ता. आमगाव) यांचा समावेश आहे. ते दोघेही दुचाकीने रोजगारासाठी नागपूरकडे निघाले होते.

प्राप्त माहितीनुसार, वघारे आणि उपराडे हे मोटरसायकल क्रमांक एमएच ३५/एएम ०६७० ने नागपूरकडे जात होते. यावेळी ऊकारा फाट्याजवळ एमएच ३५/ के १५४३ क्रमांकाच्या टाटा मॅजिकच्या चालकाने प्रवाशांना उतरवून महामार्गावर अचानक वाहन वळविले. याच दरम्यान मागून येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार धडक बसली. धडकेमुळे दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. हा अपघात घडल्यावर वाहनासह चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याच वेळी मागून भरधाव आलेल्या डस्टर कारने (एमएच ०४/ जेजी ४३१८) या दोघांनाही चिरडले. यात यादवराव वघारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र उपराडे हा कारखाली अडकून काही अंतर फरफटत गेला. त्याला गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या डस्टर कारच्या चालकाचे नाव अशोक भैय्यालाल काळसर्पे (कवळी टोला, ता. गोरेगाव) असे आहे.

घटनास्थळी लगेचच पोलिस यंत्रणा दाखल झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, वाहतूक शाखा निरीक्षक जितेंद्र बोरकर, आणि साकोली ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. या अपघातप्रकरणी फिर्यादी अशोक भैय्यालाल काळसर्पे यांच्या तक्रारीवरून टाटा मॅजिक वाहनाचा चालक अज्ञात असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वुडुले, संदीप भगत आणि महेश नेताम करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात