शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
5
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
6
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
7
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
8
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
9
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
10
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
11
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
12
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
13
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
15
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
16
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
18
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
19
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतरही ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:33 IST

महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ नामक वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत.

ठळक मुद्देसर्वकाही गुलदस्त्यात : उरल्या केवळ ‘जय’च्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ नामक वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. ‘जय’चे काय झाले याविषयी कोणीही सांगू शकत नाही. ‘जय’चे बेपत्ता होण्यामागील रहस्य कायम आहे.पर्यटकांना व जनतेला ‘जय’ची आठवण राहावी म्हणून हॉटेल सनशाईन येथे ‘जय’ प्रेमी हॉटेल मालक देवराज बावनकर यांनी ‘जय’ वाघाची पाच फुट लांबीची प्रतिकृती बनविली आहे. ‘जय’ कायमची आठवण राहावी यासाठी पवनीमध्ये ‘जय’चा पुतळा बनविण्याची मागणी पर्यटनप्रेमी करीत आहेत. जय गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील खापरी डोंगर महादेव पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो अडीच ते तीन वर्षाचा होता. या जंगलाचा समावेश नंतर उमरेड पवनी करांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात करण्यात आला. काही दिवसातच ‘जय’ वाघ या अभयारण्याचा हिरो ठरला. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवस पर्यंत आॅनलाईन बुकींग चालत होती. शेकडो पर्यटकांना प्रतिक्षा यादीवर राहावे लागत होते. अनेक सेलीब्रीटींनीही ‘जय’ला पाहण्यासाठी हजेरी लावली होती.भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाई, पाच फुट लांबी आदी गुणांनी जय हा पर्यटकांना येथे येण्यास भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जय ने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वन विभागाच्या जंगलावर आपले साम्राज्य निर्माण केले होते. अनेक मोठ्या वाघांना ‘जय’ने पळवून लावले होते. येथे ‘जय’चा एवढा दरारा होता की इतर कोणताही वाघ जय च्या धाकाने भटकत नव्हता.जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील एक महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ हा १०० चौरस किलोमिटर फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमिटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किलोमिटर अशा २५० किलोमिटरच्या जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर उमरेड भिवापूर कºहांडला जंगलात आठ दिवस राहात होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरली असतानाही जय नदी पोहून पलिकडे जात होता.‘जय’ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभिड, ब्रम्हपुरी पर्यंतच्या जंगलात वाढविले होते. त्यामुळे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतील डॉ.बिलाल हबीब यांच्या नेतृत्वाखालील चमूने जय ला दोनदा रेडीओ आय डी कॉलर लावले होते. नागझिरा जंगलात माणसांना पाहून असणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. माणसावर जय ने कधीही हल्ला केला नाही.‘जय’ नामक वाघाच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचा तपास सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबत बोलता येईल.- विवेक होशिंग,उपवनसंरक्षक, भंडारा

टॅग्स :Tigerवाघ